IND vs SA : भारत वि. दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेत कोण जिंकणार? माजी क्रिकेटपटू म्हणाला...

मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व केएल राहुल करणार आहे
India vs SA T20
India vs SA T20 Saam Tv
Published On

नवी दिल्ली: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs SA T20) यांच्यात उद्यापासून सुरू 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवरती (Arun Jaitley Stadium) खेळवला जाणार आहे. भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राने मालिकेबाबत भविष्यवाणी केली आहे. 5 सामन्यांची ही मालिका कोणता संघ जिंकणार याबाबत आकाश चोप्राने आपलं मत मांडलं आहे. (India vs SA T20 Series 2022 Latest Marathi News)

India vs SA T20
सोशल मीडिया 'किंग' कोहलीने गाठला इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विराट आकडा

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात उद्यापासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. यावेळी भारतीय संघ वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणार आहे. त्यामुळे मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व केएल राहुल करणार आहे. त्याचबरोबर ऋषभ पंत उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल.

IND vs SA : मालिकेत सर्वाधिक धावा कोण बनवणार?

आकाश चोप्राने आपल्या युट्यूब चॅनलवरून ही भविष्यवाणी केली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉक आणि भारतासाठी केएल राहुल या मालिकेत सर्वाधिक धावा करणारे असतील. या दोन फलंदाजांसाठी ही मालिका चांगलीच रंगणार असल्याचा अंदाज चोप्राने व्यक्त केला. हे दोन्ही फलंदाज आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी सलामीला उतरत होते.

India vs SA T20
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पदार्पणातच द्विशतक ठाेकणारा सुवेद पारकर ठरला मुंबईचा दुसरा फलंदाज

IND vs SA : मालिकेत सर्वाधिक विकेट कोण घेणार?

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा या टी-20 मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल असं आकाश चोप्राने म्हटलं आहे. रबाडाने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध ४ बळी घेतले आहेत. याशिवाय गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या या मालिकेत एकदा तरी नक्कीच 'मॅन ऑफ द मॅच' होईल, असा अंदाज चोप्राने वर्तवला.

IND vs SA : मालिका कोणता संघ जिंकेल?

चोप्राने आपल्या भविष्यवाणीत हे देखील सांगितले की, 5 सामन्यांची ही टी-20 मालिका कोणता संघ जिंकेल. या मालिकेत भारताला कडवी टक्कर मिळणार आहे. पण भारतीय संघ ही मालिका 3-2 ने जिंकू शकेल, असा विश्वास चोप्रा यांनी व्यक्त केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com