Ind vs Pak, Asia Cup 2023: राखीव दिवसाचा फायदा पाकिस्तानलाच! टीम इंडियाची चिंता वाढली

India vs Pakistan Latest News Updates: हा सामना राखीव दिवशी होणार असल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
India vs Pakistan Latest News Updates
India vs Pakistan Latest News Updatestwitter
Published On

India vs Pakistan, Asia Cup 2023:

कोलंबोच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

आतापर्यंत झालेल्या सामन्यात भारतीय संघाने २ गडी बाद १४७ धावा केल्या आहेत. मात्र पावसाने व्यत्यय आणल्याने हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाणार आहे.

या सामन्यापूर्वीच पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र सामना सुरू झाला आणि २४ षटकं झाल्यानंतर पावसाचं आगमन झालं.

ज्यावेळी पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी विराट कोहली आणि केएल राहुल टीचून फलंदाजी करत होते. आता हा सामना राखीव दिवशी म्हणजेच आज (११ सप्टेंबर) रोजी खेळवला जाणार आहे.

India vs Pakistan Latest News Updates
IND vs PAK, Weather Update: पावसाचं ठरलंय! राखीव दिवशीही १०० टक्के पावसाचा अंदाज, सामना रद्द झाल्यास काय होणार?

राखीव दिवसामुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ..

आशिया चषकात सुपर ४ सामन्यांचा थरार सुरू आहे. ठरलेल्या वेणपत्रकानुसार भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत तर दुसरा सामना श्रीलंकेसोबत होणार आहे या दोन्ही सामन्यांच्यामध्ये १ दिवसांचा गॅप देण्यात आला होता. मात्र आता राखीव दिवशी सामना होत असल्याने भारतीय संघाला सलग ३ दिवस मैदानावर उतरावं लागणार आहे.

कारण २४ तासांनंतर म्हणजेच १२ सप्टेंबर रोजी भारत - श्रीलंका लढत होणार आहे. सलग २ दिवस सामने खेळत असल्यामुळे तिसऱ्या दिवशी होणाऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंना थकवा जाणवू शकतो. (Latest sports updates)

India vs Pakistan Latest News Updates
IND vs PAK, Asia Cup 2023: ...म्हणून IND vs PAK सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलला मिळाली संधी; समोर आलं मोठं कारण

भारतीय संघाची दमदार सुरुवात..

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. बाबर आझमला असं वाटलं होतं की, या सामन्यातही शाहीन ,नसीम आणि रउफची जोडी भारतीय टॉप ऑर्डर फोडून काढेल.

मात्र असं काहीच झालं नाही. रोहित आणि गिलच्या जोडीने दमदार सुरुवात करून देत १२१ धावांची भागीदारी केली. या डावात रोहित ५६ तर गिल ५८ धावा करत माघारी परतला. विराट कोहली आणि केएल राहुल अजूनही नाबाद आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com