Asia Cupभारतच जिंकणार; फायनलआधी पाकिस्तानच्या दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

India vs Pakistan Asia Cup Final: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप २०२५ च्या अंतिम सामना होणार आहे. या सामन्याआधी महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने एक भाकित केलंय.
India vs Pakistan Asia Cup Final
Wasim Akram predicts India’s victory against Pakistan in the Asia Cup 2025 final at Dubai International Stadium.saam tv
Published On
Summary
  • दुबईत आशिया कप २०२५ चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.

  • सामन्यापूर्वी पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रमने भविष्यवाणी केली.

  • वसीम अक्रमने भारत जिंकेल आणि ट्रॉफी मिळवेल असे भाकीत केले.

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया कपचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूनं मोठी भविष्यवाणी केलीय. आशिया कप कोणता संघ जिंकेल याबाबत भविष्यवाणी केलीय. दरम्यान आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात, भारत आणि पाकिस्तान आज पहिल्यांदाच अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही देशांमध्ये एक रोमांचक आणि रोमांचक सामना रंगणार आहे.

आशिया कप ट्रॉफी कोण जिंकेल?

आजच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून भारत नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी आपल्या नावावर करेल. भारत हा आशिया कपमधील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियानं आठवेळा विजेतेपद जिंकलंय. सहा जेतेपदांसह श्रीलंका हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी संघ आहे. तर पाकिस्तानने आतापर्यंत दोनदा आशिया कप जिंकलाय.

India vs Pakistan Asia Cup Final
IND vs PAK Final: ‘सचिन-कोहली’सारखं बुमराह पाकिस्तानला नडणार, म्हणून आज बूम-बूम ठरणार ‘गेम चेंजर’

यंदाचा आशिया कप जिंकण्याच्या हेतूने पाकिस्तानचा संघ मैदानात उतरले. पण याचदरम्यान पाकिस्तानचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने पाकिस्तानी लोकांचं मन दुखवणारे भाकित केलंय. आशिया कप २०२५ चा ट्रॉफी जिंकण्यासाठी भारताला प्रबळ दावेदार म्हणून नाव दिलंय. "आज भारतविरुद्ध पाकिस्तान सामना आहे आणि रविवारी पाकिस्तानची गोलंदाजी प्रभावी होईल, अशी मला अपेक्षा आहे. पण हा सामना जिंकण्यासाठी भारत निश्चितच प्रबळ दावेदार आहे., असं वसीम अक्रम म्हणाला.

तुम्ही सर्वांनी पाहिले की, क्रिकेट चाहत्यांनी पाहिलं मी पाहिले आहे की या फॉरमॅटमध्ये काहीही घडू शकते. एक चांगली इनिंग, एक चांगला स्पेल सामन्याचा मार्ग बदलू शकतो. पाकिस्तान संघाने हाच आत्मविश्वास आणि गती अंतिम फेरीत घेऊन जावं. स्वतःला पाठिंबा देत हुशारीने खेळावं.

India vs Pakistan Asia Cup Final
Asia cup 2025: फायनलआधी राडा! फोटो काढायला सूर्या ब्रिगेडचा नकार, पाकिस्तानचा कर्णधार म्हणतो....

"सुरुवातीच्या षटकांमध्ये काही विकेट्स, विशेषतः अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्या विकेट्समुळे भारतावर निश्चितच दबाव येऊ शकतो. ही लढत चुरशीची असली पाहिजे आणि मला आशा आहे की सर्वोत्तम संघ शेवटी जिंकेल, असंही वसीम अक्रम म्हणालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com