India vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधीच टीम इंडियात मोठी उलथापालथ, रोहित-विराट खेळणार नाहीत?

टी २० वर्ल्डकपनंतर न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधीच टीम इंडियात मोठी उलथापालथ होणार आहे.
India vs New Zealand
India vs New ZealandSaam TV

India vs New Zealand : टी २० वर्ल्डकप २०२२ नंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन टी २० आणि तीन वनडे सामने होतील. या मालिकांसाठी टीम इंडियात रोहित शर्मा आणि विराट कोहली नसतील. ते विश्रांती घेऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवले जाऊ शकते.

रिपोर्टनुसार, केएल राहुल हा देखील टीम इंडियात नसेल. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन टी २० सामन्यांच्या मालिकेला १८ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. (Cricket News)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नोव्हेंबरमध्ये तीन टी २० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. येत्या १८ नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. टी २० वर्ल्डकप स्पर्धेनंतर लगेच टीम इंडियाचा हा न्यूझीलंड दौरा असणार आहे. (Team India)

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यानंतर केएल राहुल देखील संघात नसेल. त्यामुळे हार्दिक पंड्याकडे टीम इंडियाचे नेतृत्व दिले जाऊ शकते.

२९ वर्षीय हार्दिक पंड्याने आतापर्यंत तीन टी २० सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमारनंतर तो भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तो टीम इंडियाकडून ७६ टी २० सामने खेळला आहे. पंड्याने आयर्लंडविरुद्ध दोन टी २० सामने आणि वेस्ट इंडीज विरुद्ध एक टी २० सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने तीनही सामने जिंकले आहेत.

आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद

२०२२ हे वर्ष हार्दिक पंड्यासाठी खूपच चांगला ठरला आहे. गुजरात टायटन्ससाठी कर्णधारपद भूषवताना पहिल्याच मोसमात संघाला विजेतेपद मिळवून दिले. आशिया कप आणि टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यांत मिळालेल्या विजयात हार्दिकचा मोठा वाटा होता. दुखापतीतून सावरल्यानंतर टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. याशिवाय तो वेगवान गोलंदाजीही करत आहे.

भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा असा असेल

पहिला टी २० सामना - १८ नोव्हेंबर

दुसरा सामना - २० नोव्हेंबर

तिसरा सामना - २२ नोव्हेंबर

पहिला वनडे सामना - २५ नोव्हेंबर

दुसरा सामना - २७ नोव्हेंबर

तिसरा सामना - ३० नोव्हेंबर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com