IND vs NZ: न्यूझीलंडचा करेक्ट कार्यक्रम! सुंदरच्या 7 विकेट्स अन् एकाच सेशनमध्ये असा फिरला सामना

India vs Newzealad 2nd Test, 1st Inning: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदरची शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे.
IND vs NZ: न्यूझीलंडचा करेक्ट कार्यक्रम! सुंदरच्या 7 विकेट्स अन् एकाच सेशनमध्ये असा फिरला सामना
washington sundar twitter
Published On

IND vs NZ 2nd Test: भारत आणि न्यझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे.

कुलदीप यादवच्या जागी संधी मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदरने लंचनंतर गोलंदाजी करताना एकाच सेशनमध्ये ७ गडी बाद केले आहेत. या शानदार कामगिरीच्या बळावर भारताने न्यूझीलंडचा डाव २५९ धावांवर हाणून पाडला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला ३२ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर डेवोन कॉनव्हेने ७६ धावांची शानदार खेळी केली.

विल यंग १८ धावांवर माघारी परतला. पहिल्या २ सेशनमध्ये न्यूझीलंडचा संघ मजबूत स्थितीत होता. न्यूझीलंडने केवळ ३ फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने तिसऱ्या सेशनमध्ये गोलंदाजी करताना न्यूझीलंडच्या लागोपाठ ७ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली.

IND vs NZ: न्यूझीलंडचा करेक्ट कार्यक्रम! सुंदरच्या 7 विकेट्स अन् एकाच सेशनमध्ये असा फिरला सामना
IND vs NZ: आजपासून भारताची खरी कसोटी! पुण्यात टीम इंडिया कमबॅक करणार की न्यूझीलंड इतिहास रचणार?

वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या ७ विकेट्स

तब्बल ३ वर्षांनंतर संघात कमबॅक करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. त्याने दुसऱ्या सेशनमध्ये २ आणि तिसऱ्या सेशनमध्ये न्यूझीलंडच्या ५ फलंदाजांना बाद केलं. त्याने रचिन रविंद्र, डॅरील मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स,मिचेल सँटनर, टीम साऊदी आणि एजाच पटेलला बाद करत माघारी धाडलं. या शानदार गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडचा डाव अवघ्या २५९ धावांवर आटोपला.

IND vs NZ: न्यूझीलंडचा करेक्ट कार्यक्रम! सुंदरच्या 7 विकेट्स अन् एकाच सेशनमध्ये असा फिरला सामना
IND vs NZ 2nd Test: न्यूझीलंडचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; KL Rahul बाहेर, प्लेइंग 11 मध्ये 3 मोठे बदल

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत ( यष्टीरक्षक), सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, रविंद्र जडेजा, आर अश्विन

न्यूझीलंड - टॉम लाथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, विल यंग, रचिन रविंद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साऊदी, एजाज पटेल, विलियम ओ'रूर्क

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com