IND vs NZ, 2nd ODI : आज रंगणार दुसरा एकदिवसीय सामना, मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज; कशी असेल प्लेईंग ११?

भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहे.
IND vs Nz, 2nd ODI
IND vs Nz, 2nd ODISaam Tv

IND vs Nz, 2nd ODI News : भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्याच्या मालिकेचा आज २१ जानेवारी रोजी दुसरा सामना रायपूरच्या शहीज वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. टीम इंडिया पहिला एकदिवसीय सामना १२ धावांनी जिंकला. त्यामुळे टीम इंडियाला मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहे. (Latest Marathi News)

रायपूर शहरात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये क्रिकेट सामना होणार आहे. या स्टेडियममध्ये ६० हजारांहून अधिक प्रेक्षक सामना पाहू शकतात. या सामन्याच्या प्लेईंगवर देखील अनेकांच्या लक्ष असेल. टीम इंडियाच्या गोलंदाजीमध्ये बदल होतोय का, हे पाहावे लागणार आहे. कारण गेल्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांची न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली होती.

IND vs Nz, 2nd ODI
Ind vs NZ ODI Series: वादळी खेळीचे सिक्रेट काय? शुभमन गिलने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला वाटले नव्हते पण....'

रोहित-ईशानकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा

पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने फलंदाजीचं प्रदर्शन दाखवत द्विशतक ठोकलं. गिलच्या तुफानी फलंदाजीमुळे टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केला. बांग्लादेशच्या विरुद्ध द्विशतक ठोकणारा यष्टीरक्षक , फलंदाज ईशान किशन पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी करताना दिसला नाही. त्यामुळे या सामन्यात ईशान चांगला खेळण्याची अपेक्षा आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. पहिल्या सामन्यात रोहितने सुरुवातीला चांगली फटकेबाजी केली. मात्र, रोहित चांगलं प्रदर्शन करू शकला नाही. त्यामुळे रोहित शर्माकडून भारतीयांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. धमाकेदार फलंदाजी करणारा हार्दिक पंड्याकडूनही भारतीयांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

उमरान मलिकला मिळून शकते संधी

टीम इंडियाला सध्या गोलंदाजी चिंता सतावत आहे. बुधवारी एकदिवस सामन्यात मायकल ब्रेसवेलने न्यूझीलंडला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. मात्र, ब्रेसवेल यशस्वी ठरला नाही. त्यामुळे न्यूझीलंडची फलंदाजी पाहता टीम इंडियाच्या गोलंदाजीवर साऱ्यांचे लक्ष असणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात उमरान मलिकच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली. आता दुसऱ्या सामन्यात कोणाची निवड होईल हे पाहावे लागेल.

सिराजने केली चांगली गोलंदाजी

मोहम्मज सिराजने पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. मोहम्मद शमीने चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र, न्यूझीलंडच्या ब्रेसवेलने टीम इंडियाविरुद्ध चांगल्याच धावा कुटल्या. हार्दिक पंड्या देखील फारशी कमाल करू शकला नाही. मात्र टीम इंडियाच्या (Team India) कुलदीप यादवने चांगली गोलंदाजी केली.

IND vs Nz, 2nd ODI
Mumbai vs Delhi Ranji Trophy : सरफराज खानची शतकी खेळी व्यर्थ; दिल्लीचा ४३ वर्षांनी मुंबईवर विजय

भारतीय संघाचे संभाव्य प्लेईंग ११ : रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक

न्यूझीलंड संघाचे प्लेईंग ११ - फिन अॅलेन, डेवोन कॉन्वे, हेनरी निकोल्स , डेरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, हेनरी शिपले, लॉकी फर्ग्यूसन, ब्लेयर टिकनर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com