Ind Vs NZ ODI Series: काय सांगता! 'हे' तीन खेळाडू फक्त मैदानात पाऊल ठेवणार अन् टीम इंडिया इतिहास रचणार

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचे तीन खेळाडू मैदानावर उतरताच नव्या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे.
Ind vs NZ ODI Series
Ind vs NZ ODI Series

Ind Vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रायपुरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर रंगणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया दुसरा सामना जिंंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

मात्र, या सामन्यआधीच भारतीय संघाच्या नावावर एका मोठा विक्रमाची नोंद होणार आहे. संघातील तीन दिग्गज खेळाडू मैदानात उतरताच भारतीय संघ इतिहास घडवेल. काय आहे तो विक्रम चला जाणून घेवू.

Ind vs NZ ODI Series
Vaibhav Pichad News : 'अमृतसागर' च्या अध्यक्षपदी वैभव पिचड, रावसाहेब वाकचौरे उपाध्यक्ष

याबाबत अधिक माहिती अशी की, पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शुभमन गिलने दमदार द्विशतक झळकावले. या द्विशतकासोबतच शुभमन गिलचा द्विशतक झळकावणाऱ्या पाच भारतीय क्रिकेटपटूंच्या पंक्तीत समावेश झाला आहे. तर शुभमन गिल अशी कामगिरी करणारा सर्वात युवा खेळाडूही ठरला आहे.

या द्विशतकानंतर भारतीय संघात एकाचवेळी तीन द्विशतक खेळवणारे खेळाडू आहेत. स्वतः कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ही कामगिरी तीन वेळा केली आहे. गेल्यावर्षीच बांग्लादेशविरुद्ध ईशान किशनने द्विशतक झळकावले होते. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेवनमध्ये तीन द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंचा समावेश असेल.

Ind vs NZ ODI Series
Zilla Parishad School Students : सहलीत चिकन खाल्ल्यानंतर 52 विद्यार्थ्यांना विषबाधा, 12 जण रुग्णालयात दाखल

क्रिकेट विश्वात आतापर्यंत कोणत्याही टीमने प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 द्विशतकवीरांना एकत्र खेळवलं असेल. त्यामुळे रोहित, इशान आणि शुबमन दुसऱ्या सामन्यात खेळले तर एक खास रेकॉर्डची नोंद होईल. त्यामुळे आज हे तीन खेळाडू मैदानावर उतरताच खास रेकॉर्ड टीम इंडियाच्या नावावर होईल.

दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर किंवा उमरान मलिक. (Indian Cricket Team)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com