IND vs NEP, Playing XI: टीम इंडियात होणार मोठा बदल! नेपाळला आव्हान देण्यासाठी या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

Team India Playing 11 Prediction: नेपाळविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
indian cricket team
indian cricket team saam tv
Published On

Team India Playing 11 Against Nepal:

आशिया चषकातील भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान संघाविरूद्ध पार पडला. हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला आहे. सामना रद्द होऊनही पाकिस्तानचा संघ सुपर ४ साठी पात्र ठरला आहे.

तर भारतीय संघाचा पुढील सामना येत्या ४ सप्टेंबर रोजी नेपाळ संघाविरूद्ध रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

indian cricket team
IND vs PAK, Asia Cup 2023: रोहित- कोहलीला बाद करण्यासाठी काय होता आफ्रिदीचा मास्टरप्लान? स्वतःच केला खुलासा

नेपाळविरूद्ध होणाऱ्या सामन्यात प्लेइंग ११ बदलणार?

असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की,नेपाळविरूद्ध होणाऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीला संधी दिली गेली नव्हती.

तर अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरला देखील या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले गेले होते. त्याला या सामन्यात फलंदाजीला जाण्याची संधी मिळाली मात्र तो मोठी खेळी करू शकला नाही.

त्याला या डावात अवघ्या ३ धावा करता आल्या. त्यामुळे नेपाळविरूद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीचा प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. (Latest sports updates)

indian cricket team
IND VS PAK, Asia CUP Points Table: पावसानं 'खेळ' केला; पाकिस्तानचा मोठा फायदा, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, काय आहे समीकरण?

नेपाळ विरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा,मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.

पाकिस्तानचा सुपर ४ मध्ये प्रवेश..

हा सामना रद्द झाला असला तरी पाकिस्तानला याचा मोठा फायदा झाला आहे. कारण दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला आहे. ३ गुणांसह पाकिस्तानचा सुपर ४ साठी पात्र ठरला आहे.

तर भारतीय संघाला सुपर ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत नेपाळवर विजय मिळवावा लागणार आहे. हा सामना जर पावसामुळे रद्द झाला, तर गेल्या सामन्यातील १ गुण आणि या सामन्यातील १ गुणासह भारताचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com