Vande Mataram In Football Match: अभिमानास्पद! SAFF CUP जिंकल्यावर टीम इंडियासोबत 26 हजार प्रेक्षकांनी गायलं वंदे मातरम्! - VIDEO

SAFF CUP 2023: पेनल्टी शूटआउटमध्ये भारतीय संघाने 5-4 ने बाजी मारली.
sunil chhetri
sunil chhetrisaam tv
Published On

INDIA VS KUWAIT SAFF CUP 2023: भारतीय संघाने दमदार कामगिरी करत SAFF CUP 2023 स्पर्धेत जेतेपद मिळवले आहे. बंगळुरूच्या कांतिवीरा स्टेडियमवर भारत आणि कुवैत या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये विजय मिळवला.

यासह नवव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. हा सामना 1-1 च्या बरोबरीत समाप्त झाला होता. सामना पेनल्टी शूटआउटमध्ये पोहोचला. पेनल्टी शूटआउटमध्ये भारतीय संघाने 5-4 ने बाजी मारली.

sunil chhetri
Asia Cup 2023 Schedule: कुठे, केव्हा आणि कधी रंगणार आशिया चषक स्पर्धेतील सामने, जाणून घ्या एका क्लिकवर

भारतीय संघाने यापूर्वी 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015, 2021 मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. कुवैतने या सामन्याची दमदार सुरुवात केली होती. १४ व्या मिनिटाला अब्दुल्ला अलबलूशीने कुवैत संघासाठी पहिला गोल केला.

तर भारतीय संघाकडून लालिअनजुआला चेंगटेने 39 व्या मिनिटाला गोल करत भारतीय संघाला कमबॅक करून दिलं. भारतीय संघाला हे जेतेपद मिळवून देण्यात सुनील छेत्रीने मोलाची भूमिका बजावली आहे.

सुनील छेत्री या स्पर्धेत गोल्डन बूट आणि गोल्डन बॉलचा मानकरी ठरला. हा सामना झाल्यानंतर सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक एकसुरात वंदे मातरम गाताना दिसून आले.

वंदे मातरमचा व्हिडिओ व्हायरल..

हा सामना पेनल्टी शूटआउटमध्ये पोहोचला होता. पेनल्टी शूटआउटमध्ये भारतीय संघाने बाजी मारताच, प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढला. सामना पाहण्यासाठी आलेले हजारो प्रेक्षक भारतीय संघाच्या विजयानंतर वंदे मातरम गाताना दिसून आले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले आहे. (Latest sports updates)

या सामन्यात गुरप्रित संधू विजयाचा हिरो ठरला. त्याने पेनल्टी शूटआउटमध्ये गोल अडवले. हा सामना झाल्यानंतर तो म्हणाला की, 'मला असं वाटतं की, आम्ही खरंच चांगली कामगिरी केली आहे. एक गोलने मागे असून सुद्धा संघाने माघार घेतली नाही. याचं श्रेय संपूर्ण संघाला जातं. पेनल्टीमध्ये विजय मिळवणं हे आपलं नशीब किती चांगलं आहे यावर अवलंबून असतं. आज आमचं नशीब चांगलं होतं.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com