IND vs ENG: गुवाहाटीत टीम इंडियाच्या हाती आली निराशा; पावसाने खराब केला खेळ

IND vs ENG: सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध तयारी करण्याची संधी मिळाली नाही. आता टीम इंडियाचा पुढचा सराव सामना नेदरलँडशी होणार आहे.
IND vs ENG
IND vs ENG BCCI (Saam Tv)

India vs England Warm-up Match:

गुवाहाटी येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषक २०२३ चा सराव सामना खेळाला जाणार होता. परंतु पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. सराव सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणल्यामुळे त्याचा फटका टीम इंडियाला बसलाय. टीम इंडियाचा हा पहिलाच सराव सामना होता. हा सामना सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर सामना सुरू होऊ शकला नाही. (Latest Sport News)

याआधी शुक्रवारी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. टीम इंडियाचा पुढचा सराव सामना नेदरलँडशी होणार आहे. संपूर्ण विश्वचषकात गुवाहाटीत भारतीय संघाला एकच सराव सामना खेळायचा होता, पण पावसाने संधी हिरावून घेतली. या सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी याच मैदानावर श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला.

नाणेफेकनंतर वरुण राजाचं आगमन

भारतीय संघालाही खेळताना पाहण्याची संधी मिळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही. सामन्याची नाणेफेक झाली होती आणि रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामना सुरू होण्याआधीच्या ५ मिनिटांआधी पाऊस सुरू झाला. पाऊस इतका मुसळधार होता की सुमारे दीड तासाच्या प्रतीक्षेनंतरही पाऊस चालूच होता. शेवटी पंचांनी पंचांनी दोन तासांनंतर सामना रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर भारतीय आणि इंग्लंड संघ स्टेडियममधून त्यांच्या हॉटेलमध्ये परतले.

दरम्यान भारताचा पुढील सराव सामना आता ३ ऑक्टोबर रोजी तिरुअनंतपुरम येथे नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. परंतु येथेही पाऊस सुरू असल्याने यावर पावसाची सावली कायम राहणार आहे. शुक्रवारी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामनाही सुरू न होता रद्द करण्यात आला होता. तर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड यांच्यातील सामनाही रद्द करण्यात आला होता.

IND vs ENG
Varanasi Cricket Stadium: वाराणसी होणार शिवमय; PM मोदींनी केलं क्रिकेट स्टेडियमचं भूमीपुजन, कार्यक्रमाला दिग्गज मंडळीची हजेरी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com