IND Vs ENG: जसप्रीतचा 'Class Shot'; बुमराहचा कव्हर ड्राईव्हवर चौकार, ड्रेसिंग रुम टाळ्यांचा कडकडाट

Jasprit Bumrah: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजीनंतर धरमशाला कसोटीच्या पहिल्या डावातील त्याच्या कव्हर ड्राईव्हमुळे चर्चेत आहे. जसप्रीतने मार्क वुडच्या फुल लेन्थ बॉलवर उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह फटका मारला होता.
Jasprit Bumrah
Jasprit BumrahSaam Tv

Jasprit Bumrah Cover Drive On Mark Wood Ball:

धरमशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची फलंदाजी खूपच चांगली राहिली.दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ८ गडी गमावून ४७३ धावा केल्या होत्या. या डावात नेहमी यॉर्करसाठी चर्चेत राहणारा जसप्रीत बुमराह फलंदाजीमुळे चर्चेत आहे. जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या फुल लेन्थ बॉलवर उत्कृष्टपणे कव्हर ड्राईव्हवर फटका मारला. बुमराहचा हा उत्कृष फटका पाहून सर्व भारतीय खेळाडू अवाक झाले. ड्रेसिंग रुममध्ये बसलेले सर्व खेळाडू उभे राहत जसप्रीत बुमराहसाठी टाळ्या वाजवत होते. (Latest News)

धरमशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या फलंदाजीने शानदार कामगिरी केली. आधी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी खेळली. त्यानंतर सर्फराज खानने आपले अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडिक्कलनेही ६५ धावा केल्या. भारताच्या टॉप ऑर्डरची उत्कृष्ट कामगिरी असूनही चाहत्यांना जसप्रीत बुमराहचा कव्हर ड्राईव्ह सर्वोत्कृष्ट फटका वाटला आणि टाळ्या वाजून त्याचं कौतुक केलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंग्लंडची गोलंदाजी चालू असताना जलद गती गोलंदाज मार्क वुड हा ११७ वा षटकार टाकत होता. त्यावेळी फलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह होता. वुडने जसप्रीतला फुल लेन्थवर चेंडू टाकला. त्याला चेंडूवर बुमराहने उत्कृष्ट कव्हर ड्राईव्हवर फटका मारला. बुमराहचा शॉट पाहिल्यानंतर संघाचे सहकारी खेळाडू आणि संघाचे सपोर्ट स्टाफ बुमराहच्या कव्हर ड्राईव्हवर खुश झाले आणि टाळ्या वाजवत त्याचे कौतुक करू लागले.

भारतीय संघाने ४२७ धावा केल्यानंतर दोन विकेट लगेच गेल्या. ४२७ धावा केल्यानंतर एक मिळताच भारतीय संघाला अश्विनच्या रुपात ८ वा धक्का मिळाला. भारतीय संघ लवकर ऑलऑउट होईल असं सर्वांना वाटत असताना दहाव्या विकेटसाठी मैदानावर असलेल्या कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी ४५ धावा संघासाठी जोडल्या. दोन्ही फलंदाजांनी भारतीय संघाला ४७३ धाव संख्येवर पोहोचवलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याची घोषणा होईपर्यंत कुलदीप यादवने ५५ चेंडूत २७ धावा केल्या आहेत. तर जसप्रीत बुमराहने ५५ चेंडूंवर १९ धावा करत नाबाद राहिलाय.

Jasprit Bumrah
IND vs ENG 5th Test: धरमशाला कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत! रोहित- गिलच्या शतकी खेळीच्या बळावर घेतली मोठी आघाडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com