IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; वैभव सूर्यवंशीला मिळालं स्थान

ind vs eng under 19 squad : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये. या संघाचं नेतृत्व आयुष करणार आहे. तर वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान मिळालं आहे.
ind vs eng tour
ind vs eng under 19 squadg under 19 squadSaam tv
Published On

भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दुसरीकडे त्याच महिन्यात भारताचा अंडर-१९ संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने भारताच्या अंडर-१९ संघाची घोषणा केली आहे. या संघाचं नेतृत्व आयुष म्हात्रे करणार आहे. तर या संघात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला देखील स्थान मिळालं आहे. वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्ससाठी खेळला होता. वैभवने अवघ्या ३५ चेंडूत शतक ठोकलं होतं. वैभवने शतक ठोकून आयपीएलमध्ये इतिहास ठोकला.

बीसीसीआयने गुरुवारी भारताच्या अंडर-१९ संघाची अधिकृत घोषणा केली. इंग्लंडचा दौरा हा २४ जून २३ जुलैपर्यंत असणार आहे. या दौऱ्यात एक ५० षटकांची प्रॅक्टिस मॅच देखील असणार आहे. इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची एक मालिका असणार आहे. तसेच इंग्लंडच्या विरोधात दोन मल्टी डे सामन्यांचाही समावेश आहे.

ind vs eng tour
Fact Check : झटपट नोकरी सोडाल तर लाखोंचा दंड? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

वेळापत्रक

मंगळवार, २४ जून - ५० षटकांची प्रॅक्टिस मॅच

शुक्रवार, २७ जून - पहिली वनडे

सोमवार- ३० जून - दुसरी वनडे

बुधवार, २ जुलै - तिसरी वनडे

शनिवार, ५ जुलै - चौथी वनडे

सोमवार, ७ जुलै - पाचवी वनडे

१२ ते १५ जुलै - पहिला मल्टी-डे सामना

२० ते २३ जुलै - दुसरा मल्टी-डे सामना

ind vs eng tour
Jalna Rain Today : तुफान पावसामुळे लग्नाचा मंडप उडाला; वऱ्हाडी मंडळींची तारांबळ, VIDEO

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा अंडर १९ संघ -

आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चौधा, राहुल कुमार, अभिग्यन कुंडू (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), हरवंश सिंह (यष्टिरक्षक), आर. एस. अंब्रीश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, युधाजीत गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद इनान, आदित्य राणा, अनमोलजीत सिंह

राखीव खेळाडू :

नमन पुष्पक, डी. दीपेश, वेदांत त्रिवेदी, विकास तिवारी, अलंकृत रापोले (यष्टिरक्षक)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com