IND vs IRE T20 Live Telecast: क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज! भारत - आयर्लंड मालिका इथे पाहता येणार FREE

Team India News: हा सामना कुठे पाहता येणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
INDIA VS IRELAND
INDIA VS IRELAND Saam Tv
Published On

India vs Ireland T20 Series: सध्या भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका झाल्यानंतर भारताचा संघ आयर्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे.

या मालिकेत जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान हा सामना कुठे पाहता येणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

INDIA VS IRELAND
Team India News: एशिया कप २१ तर वर्ल्डकप ५७ दिवसांवर, टीम इंडियाला केव्हा मिळणार परफेक्ट प्लेइंग ११; काय आहेत आव्हानं? वाचा सविस्तर

स्पोर्ट्स मिंटच्या एका वृत्तानुसार जिओ सिनेमाने भारत विरूद्ध आयर्लंड यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिकेचे डिजिटल राईट्स खरेदी केले आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना ही मालिका जिओ सिनेमा अॅपवर मोफत पाहता येणार आहे. तर टीव्हीचे राईट्स Viacom 18 कडे असणार आहेत. मात्र जिओ सिनेमावर हा सामना फ्रीमध्ये पाहता येणार आहे. भारत विरूद्ध वेस्टइंडीज टी-२० मालिकेचे लाईव्ह प्रसारण देखील जिओ सिनेमावर सुरू आहेत. यापूर्वी झालेली भारत -वेस्टइंडीज वनडे मालिका देखील जिओ सिनेमावर मोफत दाखवण्यात आली होती.

आयपीएल २०२३ स्पर्धा देखील जिओ सिनेमा अॅपवर फ्रीमध्ये् दाखवण्यात आली होती. आयपीएलच्या २ महिन्यांच्या कालावधीत जिओ सिनेमा हा अॅप तब्बल १० मिलियन लोकांनी डाउनलोड केला होता. तर स्पर्धेची व्हिव्हरशिप ३.२ कोटी इतकी होती. (Latest sports updates)

INDIA VS IRELAND
IND vs WI 3rd T20 Highlights: सूर्याच्या वादळाचा विंडीजला तडाखा; तिसरा सामना जिंकत टीम इंडियाचं दमदार कमबॅक

भारत विरूद्ध आयर्लंड मालिकेला येत्या १८ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. तर मालिकेतील दुसरा टी-२० सामना २० ऑगस्ट रोजी रंगणार आहे. या मालिकेतील अंतिम सामना २३ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. या मालिकेतून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. तर यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मासारख्या खेळाडूंना या मालिकेत संधी दिली गेली आहे. तर

आयर्लंडविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com