शेफाली वर्माची बॅट तळपळली; टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरोधात चौकार-षटकारांचा वर्षाव, दिलं इतक्या धावांचं आव्हान

india vs south africa women : स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माची बॅट तळपळली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरोधात चौकार-षटकारांचा वर्षाव केला.
india vs south africa
india vs south africa women :Saam tv
Published On
Summary

महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोरदार फलंदाजी

शेफाली वर्मा (८७) आणि स्मृती मंधाना (४५) यांनी पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी

स्मृती ५८ चेंडूत ४५ धावा करून बाद झाली

पावसाचं सावट असूनही भारतीय फलंदाजांची आक्रमक सुरुवात

पावसाचं सावट असलेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरोधात जोरदार फलंदाजी केली. टीम इंडियाच्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 299 धावांचं आव्हान दिलं.

india vs south africa
Pankaj Tripathi Mother Death : प्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक; 89 व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाच्या सलामीवर फलंदाजींनी चांगली सुरुवात केली. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना हिने पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचली.

india vs south africa
ऑफिसमध्ये लाइट बंद करण्यावरून वाद पेटला; सहकारी कर्मचाऱ्याने डंबल फेकून मारला, ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

स्मृतीने ५८ चेंडूत ४५ धावा केल्या. तर शेफाली वर्माची शतक ठोकण्याची संधी हुकली. शेफालीने ७८ चेंडूत ८७ धावा कुटल्या. दोघांनी मिळून ७ चौकार आणि २ षटकार लगावले. तर मागच्या शतकात शतक ठोकणाऱ्या जेमिमाने ३७ चेंडूत २४ धावा कुटल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर २९ चेंडूत २० धावा करून बाद झाली.

अमनजोतने १४ चेंडूत १२ धावा कुटल्या. ऋचा घोषने ३४ धावा कुटल्या. तर दीप्ती शर्मा ५८ धावा करून बाद झाली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात ५० षटकात ७ गडी गमावून २९८ धावा कुटल्या. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान ५० षटकाच्या फॉरमॅटमध्ये ३४ सामने झाले आहेत. त्यातील २० सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर १३ सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.

Q

भारताच्या फलंदाजांनी किती धावांची भागीदारी केली?

A

शेफाली वर्मा (८७) आणि स्मृती मंधाना (४५) यांनी पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com