Arshdeep Singh: ' तो' झेल सुटला अन् भारताच्या हातून सामना निसटला

सामन्यात गोलंदाज अर्शदीप सिंहने असिफ अलीची कॅच सोडल्याने भाराताचा पराभव झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
IND vs PAK Asia Cup 2022
IND vs PAK Asia Cup 2022saam tv
Published On

IND vs PAK Asia Cup 2022 : आशिया करंडक स्पर्धा २०२२ मध्ये क्रिकेटचे रंगतदार सामना पाहायला मिळाला. आज रविवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा अटीतटीचा सामना झाला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत पाकिस्तान समोर १८२ धावांचं आव्हान ठेवलं. मात्र, पाकिस्तानचे आक्रमक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाझने धडाकेबाज फलंदाजी करत संघाला विजयाची गवसणी घातली. या सामन्यात गोलंदाज अर्शदीप सिंगने असिफ अलीची कॅच सोडल्याने भाराताचा (India) पराभव झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

IND vs PAK Asia Cup 2022
IND vs PAK Asia Cup 2022: अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानची बाजी, भारताचा निसटता पराभव

टीम इंडियाचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि के एल राहुलने आक्रमक फलंदाजी करत भारताला चांगली सुरुवात दिली. रोहित-राहुलने पाच षटकांत ५३ धावांची भागिदारी केली. परंतु, पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौऊफने रोहित शर्माला २८ धावांवर बाद केले. त्यानंतर के एल राहुलही शादाब खानच्या गोलंदाजीवर २८ धावांवर माघारी परतला. मागील सामन्यात चमकदार कामगिरी केलेला सूर्यकुमार यादव आजच्या सामन्यात दमदार कामगिरी करु शकला नाही. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रिषभ पंतलाही धावांचा सूर गवसला नाही. रिव्हर्स स्वीफ मारण्याच्या इराद्यात पंथने विकेट गमावली. गेल्या सामन्यातील स्टार खेळाडू हार्दिक या सामन्यात मात्र निराशा केली. हार्दिकला भोपळाही फोडता आला नाही.मोहम्मद हुसनैनने हार्दिकला शुन्यावर बाद केलं.

IND vs PAK Asia Cup 2022
Asia Cup| पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया फायनल खेळणार? जाणून घ्या सुपर-४ चे समीकरण

टीम इंडियाने २० षटकांत १८१ धावा केल्याने पाकिस्तानपुढं १८२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. विराटने आशिय कपमध्ये सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. दरम्यान, १८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम मैदानात उतरले. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ९ धावा दिल्या. भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिष्णोईने कर्णधार बाबर आझमला बाद करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. तर युझवेंद्र चहलने फखर जमानला 15 धावांवर बाद केलं. मोहम्मद रिझवान भारताविरोधात आक्रमक खेळी करत आहे. रिझवान अर्धशतकी खेळी करून मैदानावर धावांचा पाठलाग करत आहे. सोळाव्या षटकात भुवनेश्वर कुमारने मोहम्मद नवाझला 42 धावांवर बाद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com