Rohit Sharma: पाऊस आला तरी न्यूझीलंडचं काही खरं नाही; पहिल्या कसोटीआधी रोहितने सांगितला मास्टरप्लान

Rohit Sharma Press Conference, IND vs NZ 1st Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटीआधी रोहितने पत्रकार परिषदेत सहभाग घेतला होता.
Rohit Sharma: पाऊस आला तरी न्यूझीलंडचं काही खरं नाही; पहिल्या कसोटीआधी रोहितने सांगितला मास्टरप्लान
rohit sharmatwitter
Published On

India vs New Zealand 1st Test: भारतीय संघ नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. बांगलादेशला पराभवाची धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हा सामना उद्यापासून बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्याच्या एक दिवसापूर्वी कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आपला प्लान सांगितला आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा थरार बंगळुरुत रंगणार आहे. भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी म्हणजे, या सामन्यावरही पावसाचं सावट असणार आहे. रोहित म्हणाला, पाऊस आला, तरीदेखील आम्ही जिंकण्याचाच प्रयत्न करु. भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच बांगलादेशला २-० ने पराभूत केलं होतं. आता न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत भारतीय संघ ३-० ने विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Rohit Sharma: पाऊस आला तरी न्यूझीलंडचं काही खरं नाही; पहिल्या कसोटीआधी रोहितने सांगितला मास्टरप्लान
IND vs BAN: जलवा है हमारा.. जे रोहित, विराट अन् धोनीलाही नाही जमलं ते सूर्या भाऊने करुन दाखवलं

'कानपूरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात आम्हाला २ दिवस खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर आम्ही सामना जिंकण्याचा विचार केला. इथे काय होणार, मला माहीत नाही. पुढे काय होतंय, ते पाहू आणि मग निर्णय घेऊ. मात्र आम्ही जिंकण्यासाठीच खेळणार.' असं रोहित शर्मा म्हणाला.

Rohit Sharma: पाऊस आला तरी न्यूझीलंडचं काही खरं नाही; पहिल्या कसोटीआधी रोहितने सांगितला मास्टरप्लान
IND vs BAN Records: रेकॉर्ड ब्रेकिंग सामना! टीम इंडियाने एकाच सामन्यात मोडून काढले हे मोठे रेकॉर्ड्स

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईत पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत एकतर्फी विजयाची नोंद केली होती. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना कानपूरमध्ये पार पडला.

या सामन्यातील पहिल्या दिवशी अवघ्या ३५ षटकांचा खेळ झाला. त्यानंतर पावसामुळे पुढील अडीच दिवस १ चेंडू टाकला गेला नव्हता. चौथ्या दिवशी जेव्हा भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगलच धुतलं. पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजी करताना बांगलादेशचा डाव स्वस्तात आटोपला. भारतीय संघाने अवघ्या अडीच दिवसात सामना जिंकून बांगलादेशला २-० ने धूळ चारली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com