Ind vs NZ: धोनी अन् विराटच्या पंक्तीत रोहितचाही समावेश, ‘अशी’ कामगिरी करणारा आठवा कर्णधार

या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय तर मिळवलाच सोबतच कर्णधार Rohit Sharma च्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंदही झाली.
Rohit Sharma
Rohit SharmaSaamtv
Published On

Ind Vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना नुकताच पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवत मालिका खिशात घातली. न्यूझीलंडचे अवघ्या १०९ धावांचे लक्ष घेवून मैदानात उतरलेल्या टीम इंडियाकडून कर्णधार रोहितने अर्धशतक करत जोरदार सुरूवात करुन दिली.

या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय तर मिळवलाच सोबतच कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंदही झाली. या विक्रमानंतर आता रोहितचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराटच्या पंक्तीत समावेश झाला आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma: 3 वर्षांपासून एकही शतक नाही! रोहितची बॅट थंड का? स्वतःचं केला खुलासा, म्हणाला; 'मला माहित आहे...'

याबाबत अधिक माहिती अशी की, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. त्यामुळे अवघ्या १०८ धावा करत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ तंबूत परतला.

यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने जोरदार सुरूवात करुन दिली.

Rohit Sharma
Viral Video: मारा, झोडा की आणखी काय! कोच राहुल द्रविड यांना नक्की काय म्हणायचंय? Video पाहा अन् तुम्हीच सांगा..

रोहितच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद:

सामन्यादरम्यान रोहितने दहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचत 37 धावा केल्या. यातील 32 धावांचा आकडा पार होताच रोहितच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. रोहित शर्मा याने कर्णधार म्हणून जवळपास 60च्या सरासरीने आणि 100हून अधिकच्या सरासरीने 1000 धावांचा टप्पा पार केल्या.

बनला आठवा कर्णधार:

भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी एमएस धोनी (MS Dhoni) आहे. त्याने यादरम्यान एकूण 6641 धावा केल्या होत्या. यादीत दुसऱ्या स्थानी विराट कोहली असून त्याने कर्णधार म्हणून 5449 धावा केल्या आहेत.

तिसऱ्या स्थानी मोहम्मद अझरुद्दीन असून त्यांनी कर्णधार म्हणून 5239 धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त सौरव गांगुलीने कर्णधार म्हणून 5082, राहुल द्रविड याने 2658, सचिन तेंडुलकर याने 2454 आणि कपिल देव यांनी 1564 इतक्या धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com