IND vs IRE: आयर्लंडचे फलंदाज खटाखट-खटाखट बाद; अवघ्या ९६ धावांवर संपूर्ण संघ गारद

India Vs Ireland T20 World Cup 2024 : T २० विश्वचषकाच्या ८ व्या सामन्यात टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात सामना खेळला जात आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे.
IND vs IRE: आयर्लंडचे फलंदाज खटाखट-खटाखट बाद; अवघ्या ९६ धावांवर संपूर्ण संघ गारद
India Vs Ireland T20 World Cup 2024

T२० विश्वचषकाच्या ८व्या सामन्यात एकेकाळची चॅम्पियन टीम इंडिया आणि आयर्लंडचा संघ आमनेसामने आहेत. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन्ही संघाचा सामना होतोय. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण प्रथम फलंदाजीच आमंत्रण घेणं आयर्लंडचे कर्णधार पॉल स्टर्लिंगला महागात पडलं. भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजी पुढे आयर्लंडचे फलंदाजांनी गुडघे टेकले. अख्खा संघ १००चा आकडाही पार करू शकला नाही. आयर्लंडच्या संघाने १६ षटकात १० विकेट गमावत फक्त ९६ धावा केल्या.

भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा चालू ठेवत आयर्लंडचा संघ १००च्या आता तंबूत पाठवला. सुरुवातीपासून भारतीय संघाने आयर्लंडच्या संघावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं. दबावात खेळणाऱ्या आयर्लंडच्या संघाच्या फलंदाजी पडझड १६ व्या षटकापर्यंत चालूच राहिली. आयर्लंडने ८ षटकात ४ विकेट ३६ धावांवर गमावल्या होत्या. आयर्लंडच्या संघाने ८ गडी ५० धावांत गमावले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com