Ind vs Eng Test: इंग्लंड कसोटीत खराब फिल्डिंग केली यशस्वी जयस्वालनं, व्हिडिओ व्हायरल होतोय रोहित शर्माचा...VIDEO

Yashasvi Jaiswal Viral Video: लीड्स कसोटीत खराब क्षेत्ररक्षणामुळे यशस्वी जैस्वालवर क्रिकेट चाहत्यांकडून टीका करण्यात येत आहे. या सामन्यात त्याने अनेक झेल सोडले. लीड्स कसोटीनंतर यशस्वी जैस्वालचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यावेळी तत्कालीन कर्णधार रोहित शर्मा क्षेत्ररक्षणावरून रागवताना दिसतोय.
Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswal Viral Videosaam Tv
Published On

लीड्स कसोटीमध्ये भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेला कसोटी सामना अनेक कारणांमुळे आठवणीत राहील. कर्णधार म्हणून शुबमन गिलचं पदार्पण, त्याच पदार्पणात गिलचं शतक, त्यानंतर यशस्वी जैस्वालचं शतक, दोन्ही डावात रिषभ पंतचे शतक,दुसऱ्या डावात केएल राहुलचं शतक. एकूण भारतीय संघाने ५ शतकं केली होती, तरीही भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला.

त्यामुळे ही कसोटी सामना अनेकांच्या लक्षात राहील. दरम्यान भारतीय संघाच्या पराभवाला अनेक कारणे कारणीभूत होती. त्यातील एक कारण म्हणजे गबाळ क्षेत्ररक्षण. त्यात शतकवीर यशस्वी जैस्वालचाही समावेश आहे. जैस्वालनं सामन्यातील महत्त्वाचे झेल सोडले. त्यावरून त्याच्यावर टीका केली जात आहे.

यशस्वी जैस्वालने संपूर्ण सामन्यात किमान ६ झेल सोडले. त्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. याचदरम्यान जैस्वालचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा त्याला भरमैदानात झापत असल्याचं दिसत आहे. जैस्वालच्या खराब क्षेत्ररक्षणावरून रोहितला त्याला भर मैदानातच फटाकरत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या लीड्सच्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालनं तब्बल ६ झेल सोडले. त्यामुळे भारतीय संघाचा ५ विकेटने पराभव झाला. दरम्यान आता जैस्वालचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर होतोय. हा व्हिडिओ गेल्या वर्षी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी यशस्वी जैस्वालने त्यावेळी ३ झेल सोडले. ऑस्ट्रेलियाने तो सामना १८४ धावांनी जिंकला होता.

Yashasvi Jaiswal
IND vs Eng Test: टीम इंडियाच्या तीन-चार खेळाडूंना दणका बसणार; पहिल्या कसोटीतील चुका महागात पडणार

त्याच सामन्यादरम्यान, तत्कालीन कर्णधार रोहित शर्माने मैदानावरच जैस्वालला जोरदार फटकारले होतं. एका युझरने तो व्हिडिओ शेअर केलाय. त्यात लिहिले की, ' सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहितने जैयस्वालला फटकारलं होतं, त्याची आठवण येत आहे.' त्या व्हिडिओ क्लिपमध्ये यशस्वी जैस्वाल कॅच सोडताना दिसत नाहीये पण त्याला चेंडू कुठे जात आहे याची योग्य कल्पनाही मिळत नव्हती.

चेंडू दूर असतानाही तो त्याच्या जागी उडी मारताना दिसतोय, यशस्वी चेंडू लागण्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. यावर कर्णधार रोहित शर्मानं त्याला भरमैदानात सुनावलं होतं. 'अरे जैसू, तू गली क्रिकेट खेळत आहेस का? बस, चेंडू खेळेपर्यंत खाली बसून राहा, उठू नको, खाली बसून राहा, असं रोहित त्याला ओरडून सांगताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com