भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना गुरुवारपासून (2 सप्टेंबर) द ओव्हल येथे खेळला जाणार आहे. पोलिसांनी सामन्याआधीच गुरुवारी (2 सप्टेंबर) गाझियाबादमध्ये (Ghaziabad police) ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कारवाई करत पोलिसांनी टोळीतील सात जणांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की ही टोळी तीन वेबसाइट (star345.com, bet33.com आणि wa.me.com) चालवत होती. पोलिसांच्या मते, या गुन्हेगारांनी गेल्या चार वर्षांत हजारो लोकांची 200 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
सट्टेबाजाचे नाव बजिंदर कुमार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा हरियाणातील पानिपतचा रहिवासी असलेला बजिंदर हा गेल्या सहा वर्षांपासून दुबईत राहत होता आणि तेथून ही टोळी चालवत होता. पकडलेल्या आरोपिंमध्ये सुमित कुमार, भाजींदर रा. पंजाब, निखिल (31 वर्षे) निवासी हिसार, सुभाष, गोरिंदर सिंग, साहिल आणि प्रदीप मान आणि हरविंदर सिंग, पानिपतचे रहिवासी आहेत. मंगळवारी जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
बाजींदर 2015 मध्ये कामाच्या शोधात दुबईला गेला होता. तेथे त्याने एक टोळी तयार केली आणि भारतातील लोकांना ऑनलाईन गेमिंग आणि सट्टेबाजीचे मोबाइल अॅप्स डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठवून त्यांची फसवणूक सुरू केली. पोलिसांनी सांगितले की, गोरिंदर आणि हरिंदर दुबईत बाजींदरला भेटले होते. मग त्याने त्यांना गेल्या वर्षी टोळी चालवण्यासाठी भारतात पाठवले.
पोलिसांनी आतापर्यंत 70 चालू बँक खाती शोधली आहेत ज्यात टोळीने 150 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे व्यवहार केले आहेत. आरोपींची काही बँक खाती देखील जप्त करण्यात आली आहेत, ज्यात सुमारे 50 लाख रुपये आहेत. इंदिरापुरमचे सर्कल ऑफिसर आणि सायबर सेलचे प्रभारी अभय मिश्रा म्हणाले की, ही टोळी गेमद्वारे अतिरिक्त उत्पन्नाचे आश्वासन देत लोकांना व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामवर लिंक पाठवते.
लिंकवर क्लिक केल्यानंतर star345.com या वेबसाईटवर नेले जाते. यानंतर त्यांना 'रायझिंग स्टार' डाउनलोड करण्यास सांगितले जाते. हे एक अॅप आहे जिथे कोणी पैज लावू शकतो आणि रोख जिंकू शकतो. पैसे मिळवण्यासाठी क्लायंटला Bet33.com किंवा wa.me.com वर खाते तयार करण्यास सांगितले जाते. या सर्व प्रकरणाचा तपास पोलिसांनी लावला आहे आणि आरोपींनी बेड्या ठोकल्या आहेत.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.