भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे आजपासून खेळला जाणारा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. त्याची अधिकृत माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) दिली आहे. भारतीय संघ चार सामन्यांनंतर मालिकेत 2-1 ने पुढे होता.
ईसीबीने अधिकृत निवेदन जारी केले आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) चर्चा केल्यानंतर, ईसीबीने पुष्टी केली की इंग्लंड आणि भारत यांच्यात आजपासून ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे सुरू होणारी पाचवी कसोटी रद्द करण्यात आली आहे. कोविड प्रकरणांची संख्या आणखी वाढण्याच्या भीतीमुळे भारत संघ उभा करू शकला नाही. बोर्डाने असेही म्हटले आहे की पुढील माहिती योग्य वेळी सर्वांसमोर मांडली जाईल.
मालिकेचा निकाल?
भारताने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांच्या आधारावर 2-1 अशी आघाडी घेतली आहे, पण काही अहवालांमध्ये असेही दिसून आले आहे की, भारताने पाचव्या कसोटीतील पराभव स्वीकारून सामना रद्द करण्याचे समर्थन केले आहे. अशा प्रकारे, भारत ही मालिका 2-1 ने जिंकणार नाही तर मालिका 2-2 अशी बरोबरीत संपेल. मात्र, अधिकृतपणे ईसीबी किंवा बीसीसीआयने याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
उल्लेखनीय म्हणजे, लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह चार सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. रवी शास्त्री व्यतिरिक्त, संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओ नितीन पटेल यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.