Ravi Bishnoi: संधीचं सोनं केलं! २ सामने बाकावर, तिसऱ्या सामन्यात आला अन् बुमराहचा रेकॉर्ड मोडला

Youngest To Take 50 Wickets In T20I Cricket: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या सामन्यात रवी बिश्नोईने जसप्रीत बुमराहला मागे सोडलं आहे.
Ravi Bishnoi: संधीचं सोनं केलं! २ सामने बाकावर, तिसऱ्या सामन्यात आला अन् बुमराहचा रेकॉर्ड मोडला
ravi bishnoitwitter
Published On

Ravi Bishnoi Record News: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी रेकॉर्डसचा पाऊस पाडला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना धू धू धुतलं.

या फटकेबाजीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटक अखेर ६ गडी बाद २९७ धावा केल्या होत्या. या धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली. दरम्यान फिरकीपटू रवी बिश्नोईच्या नावावर एका मोठा रेकॉर्डची नोंद झाली आहे.

रवी बिश्नोईला या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. २ सामन बाकावर बसल्यानंतर अखेर तिसऱ्या सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्याने, नजमुल हुसेनला १४ धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर ४२ धावांवर फलंदाजी करत असलेल्या लिटन दासला बाद केलं.

या सामन्यात गोलंदाजीला येण्यापूर्वी त्याच्या नावे टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४८ गडी बाद करण्याची नोंद होती. दरम्यान २ गडी बाद करताच त्याने ५० चा आकडा गाठला आहे. रवी बिश्नोईने हा कारनामा २४ वर्ष आणि ३७ दिवस इतकं वय असताना करून दाखवला आहे.

यासह तो टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात ५० गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या नावावर होता. अर्शदीप सिंगने हा कारनामा २४ वर्ष १९६ दिवस इतकं वय असताना केला होता.

Ravi Bishnoi: संधीचं सोनं केलं! २ सामने बाकावर, तिसऱ्या सामन्यात आला अन् बुमराहचा रेकॉर्ड मोडला
IND vs BAN: जलवा है हमारा.. जे रोहित, विराट अन् धोनीलाही नाही जमलं ते सूर्या भाऊने करुन दाखवलं

भारतीय संघासाठी सर्वात कमी वयात ५० गडी बाद करणारे गोलंदाज

  • २४ वर्ष ३७ वर्ष - रवी बिश्नोई

  • २४ वर्ष १९६ दिवस - अर्शदीप सिंग

  • २५ वर्ष ८० दिवस - जसप्रीत बुमराह

  • २८ वर्ष २३७ दिवस - कुलदीप यादव

  • २८ वर्ष २९५ दिवस - हार्दिक पंड्या

Ravi Bishnoi: संधीचं सोनं केलं! २ सामने बाकावर, तिसऱ्या सामन्यात आला अन् बुमराहचा रेकॉर्ड मोडला
IND vs BAN मालिकेसह या खेळाडूची कारकीर्दही संपली! आधीच केली होती निवृत्तीची घोषणा

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून संजू सॅमसनने १११, सूर्यकुमार यादवने ७५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय २९७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला १६४ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने हा सामना १३३ धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com