IND A vs BAN A: नशिबानं दिलं पण कर्मानं गेलं! सुपर ओव्हरमध्ये भारत अ संघाचा लाजिरवाणा पराभव

IND A vs BAN A Rising Stars Asia Cup : आशिया कप रायझिंग स्टार्सचा उपांत्य सामना हृदयाची ठोके वाढवणारा राहिला. एकाक्षणी भारताचा संघ पराभूत होईल असं वाटत होतं. परंतु भारतीय खेळाडूंनी हा सामनाचा निकाल सुपर ओव्हरमध्ये नेला. पण भारताला सूपर विजय मिळवता आला नाही.
India A players disappointed after a shocking collapse in the Super Over against Bangladesh A.
India A players disappointed after a shocking collapse in the Super Over against Bangladesh A.
Published On

दैवं देतं आणि कर्म नेतं...असं म्हणतात. इथं नशिबानं दिलं पण कर्मानं गमावलं असं भारत अ संघाच्या बाबतीत म्हणावं लागेल. बांगलादेश अ संघाच्या खेळाडूंनी अखेरच्या षटकांमध्ये कॅच सोडल्या, रन आऊटचा चान्स गमावला आणि भारत अ संघाला सुपरओव्हरमध्ये विजयाची आयती संधी दिली. पण भारत अ संघाला ही विजयाची संधी साधता आली नाही. सुपरओव्हरमध्ये फलंदाजीला रमणदीप आणि जितेशला पाठवलं. जितेशची हाराकिरी नडली. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट गमावली.

India A players disappointed after a shocking collapse in the Super Over against Bangladesh A.
IND vs SA: गुवाहाटी टेस्टसाठी ऋषभ पंत कर्णधार; गिलची जागा कोण घेणार? पाहा संभाव्य प्लेईंग ११

नंतर आलेल्या आशुतोषनं फटका मारायच्या नादात बांगलादेश अ संघाच्या फिल्डरकडं झेल देऊन बसला. त्यानंतर बांगलादेशचे फलंदाज मैदानात उतरले. भारतीय कर्णधारानं सुयशच्या हाती चेंडू सोपवला. पहिल्याच चेंडूवर बांगलादेशचा फलंदाज बाद झाला आणि पुन्हा चुरस निर्माण झाली. अकबर मैदानात आला. त्याला सुयशनं चेंडू फेकला. पण म्हणतात ना कर्मानं सगळंच गमावलं तसंच अगदी सुपरओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर झालं. सुयशचा हा चेंडू वाइड गेला आणि बांगलादेशला आयता विजय मिळाला.

India A players disappointed after a shocking collapse in the Super Over against Bangladesh A.
Ashes 2025-26: W,W,W,W,W,W,W... स्टार्कच्या वादळात इंग्लंडची दाणादाण, फक्त १७२ धावात उडाला खुर्दा

आशिया कप रायझिंग स्टार्सचा उपांत्य सामना भारत अ आणि बांगलादेश अ यांच्यात झाला. भारत अ संघाचा कर्णधार जितेश शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघानं भारताला १९४ धावांचे आव्हान दिलं. याचा पाठलाग करताना भारतीय संघाने २० षटकात ६ विकेट गमावत १९४ धावा केल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. परंतु सुपर ओव्हरमध्ये भारताची फलंदाजी खराब झाली. पहिल्या दोन चेंडूत त्यांनी दोन विकेट गमावल्या. बांगलादेशला जिंकण्यासाठी आता फक्त एका धावेची आवश्यकता होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com