ICC Womens T20 World Cup 2024 Schedule: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला आजपासून (३ ऑक्टोबर) सुरुवात होणार आहे. यापूर्वी या स्पर्धेचे आयोजन बांगलादेशमध्ये केले जाणार होते. मात्र बांगलादेशमध्ये राजकीय भुकंप झाल्याने या स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या स्पर्धेची सुरुवात बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात होणाऱ्या सामन्याने होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही संघ भिडणार आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना ४ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. तर बहुप्रतिक्षीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान जाणून घ्या स्पर्धेबद्दल सर्वकाही.
आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात केव्हा होणार?
या स्पर्धेला ३ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर या स्पर्धेतील फायनलचा सामना २० ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.
आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत किती संघ आहेत? आणि ते किती गटांमध्ये विभागले गेले आहेत?
आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग घेतला आहे. या १० संघांना ५-५ च्या २ गटांमध्ये विभागलं गेलं आहे.
असे आहेत दोन्ही गट
ग्रुप ए- भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड, पाकिस्तान
ग्रुप बी- इंग्लंड, स्कॉटलंड, बांगलादेश, वेस्टइंडीज, दक्षिण आफ्रिका
आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सामने किती वाजता सुरु होतील?
आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता आणि संध्याकाळच्या सामन्यांना ७:३० वाजता सुरुवात होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना दुपारी ३:३० वाजता होणार आहे.
इथे पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग
हे सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता. यासह हे सामने तुम्ही डिस्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.
असं आहे या स्पर्धेचं वेळापत्रक
बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड - ३ ऑक्टोबर, दुपारी ३:३० वाजता - शारजाह क्रिकेट स्टेडियम
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका - ३ ऑक्टोबर, दुपारी ३:३० वाजता - शारजाह क्रिकेट स्टेडियम
दक्षिण आफ्रीका विरुद्ध वेस्टइंडीज - ४ ऑक्टोबर, दुपारी ३:३० वाजता - दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
भारत विरुद्ध न्यूझीलंड - ४ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता - दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका - ५ ऑक्टोबर, दुपारी ३:३० वाजता - शारजाह क्रिकेट स्टेडियम
बांगलादेश विरुद्ध इंग्लंड - ५ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता - शारजाह क्रिकेट स्टेडियम
भारत विरुद्ध पाकिस्तान - ६ ऑक्टोबर, दुपारी ३:३० वाजता - दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
वेस्टइंडीज विरुद्ध स्कॉटलंड - ६ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० - दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
इंग्लंड बनाम दक्षिण आफ्रीका - ७ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता - शारजाह क्रिकेट स्टेडियम
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड - ८ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० - शारजाह क्रिकेट स्टेडियम
दक्षिण आफ्रीका विरुद्ध स्कॉटलंड - ९ ऑक्टोबर, दुपारी ३:३० वाजता - दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
भारत विरुद्ध श्रीलंका - ९ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता - दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
बांगलादेश विरुद्ध वेस्टइंडीज - १० ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता ,शारजाह क्रिकेट स्टेडियम
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान - ११ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका - १२ ऑक्टोबर, दुपारी ३:३० वाजता,शारजाह क्रिकेट स्टेडियम
बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका - १२ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता - दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड - १३ ऑक्टोबर, दुपारी ३:३० वाजता - शारजाह क्रिकेट स्टेडियम
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - १३ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता - शारजाह क्रिकेट स्टेडियम
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड - १४ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता ,दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडीज - १५ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता , दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
सेमीफाइनल १: ग्रुप A विजेता विरुद्ध ग्रुप B उपविजेता - १७ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता - दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
सेमीफाइनल २: ग्रुप B विजेता विरुद्ध ग्रुप A उपविजेता - १८ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता - शारजाह क्रिकेट स्टेडियम
फायनल: सेमीफाइनल १ विजेता विरुद्ध सेमीफाइनल २ विजेता - २० ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.