Women's T20 WC: महिलांच्या टी-२० वर्ल्डकपबाबत ICC ची मोठी घोषणा! घेतला हा मोठा निर्णय

Umpires And Officials Announced For ICC Women's T20 World Cup 2024: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी आयसीसीने मोठी घोषणा केली आहे.
Women's T20 WC: महिलांच्या टी-२० वर्ल्डकपबाबत ICC ची मोठी घोषणा! घेतला हा मोठा निर्णय
icc umpiresicc
Published On

लवकरच आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने अंपायर्स आणि सामनाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत अंयावर असो किंवा सामनाधिकारी, या सर्वा जबाबदाऱ्या महिलाच पार पाडताना दिसून येणार आहेत. या स्पर्धेसाठी आयसीसीने १० अंपायर आणि ३ सामनाधिकारी, अशा एकूण १३ सामनाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.

केव्हा होणार सुरुवात?

आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या ३ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर या स्पर्धेतील फायनलचा सामना २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित केली जाणार होती. मात्र बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती अस्थिर असल्याने या स्पर्धेचे यजमानपद यूएईकडे सोपवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी अनुभवी आणि युवा अंपायर्सची निवड करण्यात आली आहे.

Women's T20 WC: महिलांच्या टी-२० वर्ल्डकपबाबत ICC ची मोठी घोषणा! घेतला हा मोठा निर्णय
IND vs BAN: कानपूर कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार! हा स्टार खेळाडू करु शकतो पदार्पण

या अनुभवी अंपायर्सची निवड

या स्पर्धेसाठी क्लेयर पोलोसाक या अनुभवी अंपायरची निवड करण्यात आली आहे. ते पाचव्यांदा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत अंपायरींग करताना दिसून येणार आहेत. तर जॅकलिन विलियम्स चौथ्यांदा अंपायरींग करताना दिसून येणार आहे.

Women's T20 WC: महिलांच्या टी-२० वर्ल्डकपबाबत ICC ची मोठी घोषणा! घेतला हा मोठा निर्णय
IND vs BAN 2nd Test: अश्विन की बुमराह; कानपूरची खेळपट्टी कोणासाठी ठरणार फायदेशीर? पाहा पिच रिपोर्ट

सू रेडफर्न चौथ्यांदा या स्पर्धेत अंपायरींगच्या भूमिकेत दिसणार आहेत. शेंड्रे फ्रिट्ज, मिशेल परेरा आणि जीएस लक्ष्मी यांच्याकडे सामनाधिकाऱ्यांची भूमिका सोपवण्यात आली आहे. जीएस लक्ष्मी यांच्याकडे १२ वर्षांचा अनुभव आहे.

सामनाधिकारी :शेंड्रे फ्रिट्ज, जीएस लक्ष्मी, मिचेल परेरा

अंपायर्स: लॉरेन एजेनबेग, किम कॉटन, सारा दंबनेवाना, अन्ना हॅरिस, निमाली परेरा, क्लेयर पोलोसाक, वृंदा राठी, सू रेडफर्न, एलोइस शेरिडन आणि जॅकलीन विलियम्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com