ICC Test Ranking: जलवा है हमारा..! जयस्वालने या बाबतीत किंग कोहलीलाही सोडलं मागे

Yashasvi jaiswal News In Marathi: आयसीसीने नुकताच कसोटी रँकिंगची घोषणा केली आहे. कसोटी फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयस्वालने मोठी झेप घेतली आहे
icc test rankings yashasvi jaiswal surpassed virat kohli in test ranking cricket news in marathi
icc test rankings yashasvi jaiswal surpassed virat kohli in test ranking cricket news in marathi saam tv news
Published On

ICC Test Rankings, Yashasvi Jaiswal:

आयसीसीने नुकताच कसोटी रँकिंगची घोषणा केली आहे. कसोटी फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयस्वालने मोठी झेप घेतली आहे. तो विराटला (Virat Kohli) मागे सोडत आठव्या स्थानी पोहोचला आहे. तर विराट कोहली या या यादीत नवव्या स्थानी आहे.

नुकताच भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत यशस्वी जयस्वालची बॅट चांगलीच तळपली. त्याने ८९ च्या सरासरीने ७१२ धावा केल्या. या शानदार कामगिरीच त्याला आयसीसीच्या रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे.

यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) गेल्या वर्षी वेस्टइंडिज दौऱ्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही त्याने धावा केल्या. नुकताच इंग्लंडचा भारत दौरा समाप्त झाला आहे. या मालिकेदरम्यान यशस्वीने धावांचं वादळ आणलं. त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ६८ पेक्षाही अधिकच्या सरासरीने १०२८ धावा केल्या आहेत.

icc test rankings yashasvi jaiswal surpassed virat kohli in test ranking cricket news in marathi
ICC Test Bowling Ranking: आर अश्विन कसोटीला खरा उतरला! बनला जगातील नंबर १ गोलंदाज

रोहितची मोठी झेप..

भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या यादीत सहाव्या स्थानी आहे. तो भारतीय संघाकडून या यादीत अव्वल स्थानी आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितची बॅटही चांगलीच तळपली. ही मालिका सुरु होण्यापूर्वी तो टॉप १० मध्येच नव्हता. मात्र या मालिकेत धावांचा पाऊस पाडल्यानंतर तो सहाव्या स्थानी येऊन पोहोचला आहे. (Cricket news in marathi)

icc test rankings yashasvi jaiswal surpassed virat kohli in test ranking cricket news in marathi
WPL Playoffs: मुंबईच्या पराभवानं RCB ची चांदी! पेरीच्या विक्रमी खेळीनं मिळवून दिलं प्लेऑफचं तिकीट

गोलंदाजीत आर अश्विन बनला नंबर १...

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज आर अश्विन कसोटी गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी होता. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकूण २६ गडी बाद केले. बुमराहने या मालिकेत १९ गडी बाद केले. दरम्यान कसोटी गोलंदाजांच्या यादीत अश्विन सर्वांना मागे सोडत नंबर १ गोलंदाज ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com