Ashwin Remain In First Place In ICC Test Rankings
Ashwin Remain In First Place In ICC Test Rankingssaam tv

ICC Test Rankings: कसोटी रँकिंगमध्ये अश्विनच बादशाह! पहिल्या स्थानी कायम; राहणे, शार्दुलचीही चमकदार कामगिरी

Ravichandran Ashwin Remain In First Place In ICC Test Rankings: कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नसले तरी कसोटीतील कामगिरीत त्याचा दबदबा कायम आहे.
Published on

ICC Test Rankings: रविचंद्रन अश्विनला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (ICC WTC Final 2023) अंतिम फेरीत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नसले तरी कसोटीतील कामगिरीत त्याचा दबदबा कायम आहे. कसोटी गोलंदाजी क्रमवारीत तो (Ravichandran Ashwin) पहिल्या स्थानावर कायम आहे.

कसोटी क्रमवारीत 860 गुणांसह तो पहिल्या स्थानावर आहे. परंतु ऍशेस दरम्यान त्याचं हे स्थान जाऊन शकतं. कारण त्याचा सर्वात जवळचा प्रतिस्पर्धी जेम्स अँडरसन (850) गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पॅट कमिन्सचेही 829 गुण आहे.

अजिंक्य, ठाकूरचीही प्रगती

आश्विनशिवाय भारताचा वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणेने आयसीसी क्रमवारीत दिलासादायक बातमी दिली आहे. त्याने WTC फायनलमध्ये 89 आणि 46 धावांची इनिंग खेळून फलंदाजांच्या क्रमवारीत 37 वे स्थान गाठले आहे. त्याच्याशिवाय पहिल्या डावात अर्धशतक ठोकणारा शार्दुल ठाकूरही येथे 94व्या स्थानावर पोहोचला आहे.

Ashwin Remain In First Place In ICC Test Rankings
Sunil Gavaskar: दारुण पराभवानंतर सुनील गावसकर टीम इंडियावरच भडकले! वादग्रस्त वक्तव्य करत म्हणाले....

भारतीय फलंदाजांत पंत आघाडीवर

फलंदाजांच्या यादीत भारतीय फलंदाज ऋषभ पंत 10 व्या स्थानासह भारतीय फलंदाजांमध्ये अव्वल आहे. तर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे 12व्या आणि 13व्या स्थानावर आहेत. तर गोलंदाजांच्या यादीत आश्विननंतर फिरकीपटू रवींद्र जडेजा नवव्या स्थानावर आहे. जुलै 2022 मध्ये शेवटची कसोटी खेळणारा जखमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दोन स्थानांच्या नुकसानासह आठव्या स्थानावर आहे.

पहिल्या 3 स्थानावर ऑस्ट्रेलियाचेच फलंदाज

विशेष कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांनी क्रमवारीत अव्वल 3 स्थानांवर कब्जा केला आहे. मार्नस लॅबुशेन अव्वल स्थानावर कायम आहे, तर स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानी आहे. ओव्हल येथे भारताविरुद्ध जबरदस्त कामगिरी करणारा ट्रॅव्हिस हेड तिसऱ्या स्थानावर आहे. यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीनेही 11 स्थानांची प्रगती करत 36व्या स्थानावर पोहोचले आहे. त्याने 48 आणि नाबाद 66 धावांची खेळी खेळली. (Latest Sports News)

Ashwin Remain In First Place In ICC Test Rankings
Team India Test Captain: रोहित शर्माची होणार सुट्टी? 'हे' ३ खेळाडू आहेत कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार

दुर्मिळ योग

पहिल्या 3 स्थानावर एकाच संघाचे तीन फलंदाज दिसणे फारच दुर्मिळ योग आहे. कसोटी क्रमवारीत असा योग शेवटच्या वेळी 1984 मध्ये आला होता. तेव्हा गॉर्डन ग्रीनिज (810 गुण), क्लाइव्ह लॉईड (787 गुण) आणि वेस्ट इंडिजचे लॅरी गोम्स (773 गुण) हे अव्वल तीन स्थानांवर विराजमान होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com