IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

India W vs New Zealand W, ICC T20 World Cup 2024: आयसीसी महिला टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव
team indiatwitter
Published On

आयसीसी महिला टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय महिला संघाला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. भारतीय संघाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध पार पडला. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात सुरुवातीपासूनच न्यूझीलंडचा संघ भारतीय संघावर भारी पडला. हा सामना भारतीय संघाला ५८ धावांनी गमवावा लागला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणं कठीण जातं, त्यामुळे न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला.

न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना कर्णधार सोफी डीवाईनने शानदार अर्धशतकी खेळी केली. तिने ३६ चेंडूत नाबाद ५७ धावा चोपल्या. तर सलामीला आलेल्या जॉर्जिया प्लिमरने २३ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. तर सुजी बेट्स २४ चेंडूत २७ धावा करत माघारी परतली. या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने २० षटकअखेर ४ गडी बाद १६० धावांपर्यंत मजल मारली.

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव
IND vs NZ: भारत- न्यूझीलंड यांच्यात कोण वरचढ? जाणून घ्या पिच रिपोर्ट अ्न हेड टू हेड रेकॉर्ड

भारताचे फलंदाज ठरले फ्लॉप

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६१ धावा करायच्या होत्या. आव्हान तसं कठीण नव्हतं. मात्र खेळपट्टी आणि आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता, हे जरा कठीण होतं. त्यात भारतीय फलंदाजांना भागीदारी करता आली नाही. भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. भारताकडून सलामीला आलेल्या स्म्रिती मंधानाला १२ तर शेफाली वर्माला अवघ्या २ धावा करता आल्या.

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव
IND vs BAN: बांगलादेशची खैर नाय! टी-20 मालिकेत टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू एकटा नडणार

भारतीय संघाला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली नाही. त्यानंतर हरमनप्रीत कौर १५, जेमिमा रॉड्रिग्ज १३ आणि ऋचा घोष १२ धावांवर माघारी परतली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाचा डाव १९ षटकात १०२ धावांवर आटोपला. हा सामना न्यूझीलंडला ५८ धावांनी गमवावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com