IND vs NZ: भारत- न्यूझीलंड यांच्यात कोण वरचढ? जाणून घ्या पिच रिपोर्ट अ्न हेड टू हेड रेकॉर्ड

India vs New zealand Pitch Report And Head To Head Record: भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी आमनेसामने येणार आहेत. दरम्यान कासा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड? जाणून घ्या.
IND vs NZ: भारत- न्यूझीलंड यांच्यात कोण वरचढ? जाणून घ्या पिच रिपोर्ट अ्न हेड टू हेड रेकॉर्ड
team indiatwitter
Published On

IND vs NZ, Head To Head Record: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा भारताचा या स्पर्धेतील पहिलाच सामना असणार आहे.

हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल. या स्पर्धेला बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड यांच्यातील सामन्याने सुरुवात झाली आहे. दरम्यान दुबईची खेळपट्टी कोणाला साथ देणार? जाणून घ्या.

अशी असेल खेळपट्टी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना दूबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाजांसाठीही फायदेशीर ठरते. ही खेळपट्टी स्लो असते.

त्यामुळे या सामन्यातही चेंडू बॅटवर थोडा उशिराने येईल. यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडीजचा सामना ज्या खेळपट्टीवर झाला होता,त्याच खेळपट्टीवर भारत आणि न्यूझीलंड सामना होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या टेन्शनमध्ये वाढ होणार आहे. कारण या खेळपट्टीवर फलंदाजी करणं जरा कठीण आहे.

IND vs NZ: भारत- न्यूझीलंड यांच्यात कोण वरचढ? जाणून घ्या पिच रिपोर्ट अ्न हेड टू हेड रेकॉर्ड
IND vs BAN: बांगलादेशची खैर नाय! टी-20 मालिकेत टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू एकटा नडणार

या स्टेडियमवर कसा राहिलाय रेकॉर्ड?

प्रथम फलंदाजी करताना जिंकलेले सामने - ४५

प्रथम गोलंदाजी करताना जिंकलेले सामने- ४७

नाणेफेक जिंकल्यानंतर जिंकेलेले सामने - ५२

नाणेफेक गमावून जिंकलेले सामने - ४०

या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या - २ गडी बाद २१२ धावा

या मैदानावरील सर्वोच्च धावांचा यशश्वी पाठलाग - १८४ धावा

सर्वात कमी धावसंख्या -५५ धावा

प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या -१४५ धावा

IND vs NZ: भारत- न्यूझीलंड यांच्यात कोण वरचढ? जाणून घ्या पिच रिपोर्ट अ्न हेड टू हेड रेकॉर्ड
IND vs NZ: मिशन T-20 WC साठी टीम इंडिया सज्ज! केव्हा, कुठे अन् कधी रंगणार सामने? इथे पाहा फुकटात

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर दोन्ही संघ आतापर्यंत १३ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान न्यूझीलंडने ९ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर भारतीय संघाला केवळ ४ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. हा रेकॉर्ड भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारा आहे. मात्र भारतीय संघाने आत्मविश्वासासह मैदानात उतरणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com