T-20 World Cup: भारत-पाकिस्तान 'या' दिवशी 5 वर्षानंतर येणार आमने-सामने

आगामी टी 20 विश्वचषक 2021 (ICC T-20 World Cup) मध्ये भारत आणि पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याची तारीख ठरली आहे.
T-20 World Cup
T-20 World CupSaam Tv
Published On

आगामी टी 20 विश्वचषक 2021 (ICC T-20 World Cup) मध्ये भारत आणि पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याची तारीख ठरली आहे. क्रिकेट विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील हा सामना 24 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये खेळला जाणार आहे. सुत्रांनी या संबंधिची माहिती दिली आहे.

गेल्या महिन्यात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक 2021 साठी गटांची घोषणा केली होती. ज्यामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान सुपर 12 च्या गट 2 मध्ये आहेत.

T-20 World Cup
ENGvsIND: भारतीय संघ इंग्लंडचा बदला घेईल ? ;काय असेल Playing 11

20 मार्च 2021 रोजी सांघिक क्रमवारीच्या आधारावर निवडलेल्या गटांमध्ये, गतविजेत्या वेस्ट इंडिजला सुपर 12 च्या गट 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सोबत ठेवण्यात आले आहे. ग्रुप 2 मध्ये न्यूझीलंड, अफगाणिस्तानसह भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.

पहिल्या फेरीत आठ संघ सहभागी होतील, ज्यामध्ये श्रीलंका आणि बांगलादेश क्रमवारीच्या आधारे पात्र ठरतील, तर उर्वरित 6 संघ आयसीसी पुरुषांच्या टी -20 विश्वचषक पात्रता 2019 नुसार पात्र ठरले आहेत. ग्रुप अ मध्ये आयर्लंड, नेदरलँड्स आणि नामिबिया श्रीलंकेसोबत सामना करतील, तर ग्रुप बी मध्ये ओमान, पीएनजी आणि स्कॉटलंडचा सामना बांगलादेशशी होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com