ICC Rankings: रवींद्र जडेजाने नोंदवला नवीन विक्रम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे.
ICC Rankings: रवींद्र जडेजाने नोंदवला नवीन विक्रम
ICC Rankings: रवींद्र जडेजाने नोंदवला नवीन विक्रमTwitter/ @imjadeja
Published On

भारत आणि न्यूझीलंड (INDvsNZ) यांच्यात खेळल्या जात असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम (WTC Finals) सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. साऊथहॅम्प्टनमध्ये खेळल्या जाणार्‍या सामन्याचा खेळ रिझर्व्ह डेवर खेळला जाणार आहे. परंतु त्याआधी भारतीय संघातील अष्टपैलू रवींद्र जडेजासाठी (Ravindra Jadeja) एक मोठी चांगली बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या निकालापूर्वी ही चांगली बातमी दिली आहे. बऱ्याच काळानंतर एक भारतीय कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आला आहे. (ICC Rankings: Ravindra Jadeja sets new record)

वास्तविक, रवींद्र जडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. वेस्ट इंडीज संघातील अष्टपैलू जेसन होल्डरला मागे टाकत जडेजाने ही कामगिरी केली आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजाचे सध्या 386 पॉईंट आहेत, तर जेसन होल्डर 384 पॉईंटसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमकावर बेन स्टोक्स असून त्याचे 377 पॉईंट आहेत. भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विन ​​353 पॉईंटसह आहेत. तर शकीब अल हसन 338 पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com