
ICC Test Ranking News: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने मॅचविनिंग गोलंदाजी केली होती.
या सामन्यातील दोन्ही डावात मिळून त्याने ८ गडी बाद केले होते. या शानदार कामगिरीची त्याचा रँकिंगमध्ये चांगलाच फायदा झाला आहे. आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या यादीत त्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठलं आहे.
यासह पहिल्या कसोटीत १६१ धावांची शानदार खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वाललाही मोठा फायदा झाला आहे. जयस्वाल आता फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर शतकवीर विराट कोहली १३ व्या स्थानी पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करणाऱ्या सर्वच फलंदाजांना चांगलाच फायदा झाला आहे. ७७ धावांची खेळी करणारा केएल राहुल आता ४९ व्या स्थानी पोहोचला आहे.
तर रिषभ पंत सहाव्या स्थानी कायम आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात गिल दुखापतीमुळे संघाबाहेर होता. या रँकिंमध्ये गिलचं नुकसान झालं आहे. तो १७ व्या स्थानी सरकला आहे. तर रोहित २६ व्या स्थानी कायम आहे.
गोलंदाजांच्या रँकिंगबद्दल बोलायचं झालं, तर जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा अव्वल स्थानी कब्जा केला आहे. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात बुमराहने ५ तर दुसऱ्या डावात ३ गडी बाद केले होते. या शानदार कामगिरीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. रबाडाने बुमराहला मागे सोडत पहिल्या स्थानी कब्जा केला होता. आता बुमराहने त्याला मागे सोडलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड तिसऱ्या स्थानी आहे. आर अश्विन या यादीत तिसऱ्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. पर्थ कसोटीत मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीचा फायदा घेत त्याने दोन्ही डावात मिळून ५ गडी बाद केले होते. तो या यादीत २५ व्या स्थानी पोहोचला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.