नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्डकप 2022 साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) मोठे बदल केले आहेत. आता सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यात पावसामुळं किंवा अन्य कोणत्या कारणामुळं अडथळा निर्माण झाल्यास डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निर्णय घेण्यात येईल. हा निर्णय तेव्हाच घेतला जाईल जेव्हा दोन्ही संघांनी 10-10 षटकं खेळलेली असतील. टी20 आतंराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामन्यात पावसानं खोडा घातल्यास किमान 5-5 षटकांचा खेळ झाल्यावरच डकवर्थ लुईस नियमांच्या आधारावरच निर्णय घेतला जातो. (ICC changed the rules of semifinal and final match T20 world cup)
प्ले ऑफ मॅच मध्ये होणार रिझर्व्ह डे
टी20 वर्ल्डकप मध्ये यावेळी सेमीफायनल आणि फायनल सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. जर पावसांचं व्यत्ययामुळं सेमीफायनल आणि फायनल मॅचच्या दिवशी किमान 10-10 षटकांचा खेळ झाला नाही, तर रिझर्व्ह डे चा प्रयोग केला जाईल. तसंच जर सेमीफायनलच्या सामन्यात पावसामुळं रिझर्व्ह डे मध्येही निकाल न लागल्यास ग्रुप स्टेज मध्ये अव्वल स्थानी राहणारा संघ फायनल मध्ये प्रवेश करेल.
....जर फायनल मध्ये पावसाचा खेळ सुरु झाला?
जर फायनल मध्ये पावसानं खोडा घातला, तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजयी घोषीत करण्यात येईल. 2022 च्या चॅप्मियन ट्रॉफी मध्ये भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजेतपदं देण्यात आलं होतं. टी20 वर्ल्डकपचा पहिला सेमीफायनल मॅच सिडनीत नऊ नोव्हेंबरला खेळवला जाईल. तर दुसरा सेमीफायनल मॅच अॅडलेड ओवल मध्ये 10 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. तर फायनल मॅचचं आयोजनं 13 नोव्हेंबरला मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर करण्यात आलं आहे.
पॉईंट्स टेबलनुसार 'असा' आहे नियम?
सुपर 12 मध्ये प्रत्येक टीमला विजयानंतर दोन गुण मिळत आहेत. तर पराभूत झालेल्या टीमला शून्य गुण मिळत आहेत. जर सामना बरोबरीत झाला किंवा रद्द झाला, तर दोन्ही टीमला एक-एक गुण दिला जातो. जर ग्रुपमध्ये दोन टीमचे गुण समान असल्यास, त्यावेळी त्यांनी टुर्नामेंट मध्ये किती सामने जिंकले आहेत, यानुसार निर्णय घेण्यात येईल.त्यांचा रनरेटही पाहिला जाईल आणि रिकॉर्डबाबतही माहिती घेतली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.