
आयसीसीकडून कसोटी फलंदाजांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला मोठा धक्का बसला आहे. या यादीत टॉपला असलेल्या फलंदाजांचं कुठलंही नुकसान झालेलं नाही, पण रिषभ पंत आता टॉप १० फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे. पाकिस्तानी फलंदाजाने रिषभ पंतला मागे सोडलं आहे. कोणता फलंदाज कितव्या स्थानी आहे? जाणून घ्या.
आयसीसी कसोटी फलंदाजांची याजी जाहीर करण्यापूर्वी वेस्टइंडीज आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना खेळला गेला. या यादीत इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. त्याची रेटींग ८९५ इतकी आहे.
जो रुटसह इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुक दुसऱ्या स्थानी कायम आहे. त्याची रेटींग ८७६ इतकी आहे. तर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सन तिसऱ्या स्थानी आहे. त्याची रेटींग ८६७ इतकी आहे.
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणारा यशस्वी जयस्वाल या यादीत चौथ्या स्थानी कायम आहे. त्याची रेटींग ७७२ इतकी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रेविस हेड पाचव्या स्थानी आहे. त्याची रेटींग ७७२ इतकी आहे.
पाकिस्तानचा फलंदाज साऊद शकीलने आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. तो ३ पायऱ्या वर चढत सातव्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. याचा रिषभ पंत आणि स्टीव्ह स्मिथला मोठा धक्का बसला आहे. रिषभ पंत आता दहाव्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. त्याची रेटींग ७३९ इतकी आहे.
यासह ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला देखील मोठा धक्का बसला आहे. तो नवव्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. त्याची रेटींग ७४६ इतकी आहे. तर डेरील मिचेल आता अकराव्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. त्याची रेटींग ७२५ इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.