WI vs PNG: पापुआ न्यू गिनी अन् वेस्टइंडिजच्या सामन्यात हार्दिक पंड्याची चर्चा; नेमकं काय घडलं?

Hardik Pandya Poster In WI vs PNG Match: वेस्टइंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्याची चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
WI vs PNG: पापुआ न्यू  गिनी अन् वेस्टइंडिजच्या सामन्यात हार्दिक पंड्याची चर्चा; नेमकं काय घडलं?
west indies vs papua new guienagoogle

अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्याने या स्पर्धेला दमदार सुरुवात झाली. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडिज आणि पापुआ न्यू गिनी हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात चेज आणि आंद्रे रसेल चमकले. मात्र चर्चा हार्दिक पंड्याची होत आहे. काय आहे कारण? जाणून घ्या.

तर झालं असं की, आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचे अधिकृत ब्रॉडकास्टिंगचे अधिकार हॉटस्टारकडे आहेत. दरम्यान वेस्टइंडिज आणि पापुआ न्यू गिनी या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान हॉटस्टारकडून मोठी चूक झाली. हा सामना सुरु असताना हॉटस्टारने एक पोस्टर दाखवलं, ज्यात वेस्टइंडिज आणि पापुआ न्यू गिनिच्या स्कोअर कार्डचा फोटो होता.

वेस्टइंडिजच्या स्कोअर कार्डमध्ये रोस्टन चेज, ब्रँडन किंग आणि आंद्रे रसेलचं नाव होतं. मात्र फोटो वेस्टइंडिजच्या खेळाडूंचा नसून हार्दिक पंड्याचा होता. असंच काहीसं पापुआ न्यू गिनी या संघाबाबतही पाहायला मिळालं. नाव पापुआ न्यू गिनी संघातील खेळाडूंचं होतं. मात्र फोटो हा हार्दिक पंड्याचा होता. या फोटोवर क्रिकेट फॅन्स आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

WI vs PNG: पापुआ न्यू  गिनी अन् वेस्टइंडिजच्या सामन्यात हार्दिक पंड्याची चर्चा; नेमकं काय घडलं?
IND vs PAK: 'भीती तर वाटणारच ना..', भारत- पाकिस्तान सामन्याआधीच बाबर आझम टेन्शनमध्ये

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पापुआ न्यू गिनीने ८ गडी बाद १३६ धावा केल्या. वेस्टइंडिजला हा सामना जिंकण्यासाठी १३७ धावा करायच्या होत्या. आव्हान छोटं होतं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना नवख्या पापुआ न्यू गिनीने वेस्टइंडियजला घाम फोडला. अखेर चेज आणि रसेलने महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

WI vs PNG: पापुआ न्यू  गिनी अन् वेस्टइंडिजच्या सामन्यात हार्दिक पंड्याची चर्चा; नेमकं काय घडलं?
IPL 2025 Mega Auction: मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करता येणार? फ्रेंचाईजींचं टेन्शन वाढलं!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com