
हाशिम आमला (Hashim Amla) कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वेगळा झाला असेल, पण तो काउंन्टी क्रिकेटमध्ये खेळत आहे. आमला एक असा फलंदाज आहे जो संघाला खडतर परिस्थितीमधून बाहेर काढू शकतो. निवृत्तीनंतरही आमला आपला संभाव्य खेळ खेळत आहे. त्याची प्रचिती त्याने सध्याच्या काउंन्टी क्रिकेटमध्ये दाखवली आहे. त्याने संघाला पराभावापासून वाचवण्यासाठी क्रिजवर पाय रोवून उभा राहिला आणि सामना ड्रा राहिला. दरम्यान, आमलाने काउंन्टी क्रिकेटमध्ये सर्वात संथ खेळी केली आहे.
काउंन्टी चॅम्पियनशिपमध्ये सरे आणि हॅम्पशायर यांच्यातील सामन्यादरम्यान सरेकडून खेळत असलेल्या आमलाने 278 चेंडूत 37 धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या संघाला पराभवापासून वाचवलं आणि सामना ड्रॉ केला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी सरेची टीम पराभवाच्या अगदी जवळ होती, परंतु अमलाने संथ फलंदाजी केली आणि आपल्या संघाचा पराभव रोखला. अखेर शेवटच्या दिवशी सरेने 8 बाद 128 धावा केल्या आणि सामना अनिर्णित केला. आमलाने आपल्या खेळीदरम्यान पहिल्या 100 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा केल्या.
अमला ने 278 गेंद पर नाबाद 37 रन बनाए और एक खास रिकॉर्ड अपने नाम कर लिया. फर्स्ट क्लास क्रिकेट में 40 से कम के स्कोर के लिए बल्लेबाज द्वारा खेली गई यह सबसे अधिक गेंदों का रिकॉ़र्ड है. सोशल मीडिया पर फैन्स अमला को सलाम कर रहे हैं. क्रिकेट की क्रीज पर जमकर ऐसी बल्लेबाजी करना किसी भी बल्लेबाज के लिए एक चुनौती है, लेकिन अमला ने ऐसा कमाल कर एक बार साबित कर दिया है वो क्रिकेट के इतिहास के सबसे बेहतरीन बल्लेबाज में से एक हैं.
आमलाने 278 चेंडूत नाबाद 37 धावा करुण आपल्या नावावर खास विक्रम नोंदवला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजाकडून 40 पेक्षा कमी धावसंख्या काढणासाठी प्रथमच एवढे चेंडू खेळले आहेत. सोशल मीडियावर चाहते आमलाचे कौतूक करत आहेत. क्रिकेटच्या मैदानावर अशी खेळी करणं हे एका उत्तम खेळाडूलाच जमू शकतं. 2015 साली आमलाने भारताविरुद्ध असाच एक डाव खेळला होता. जेव्हा त्याने 244 चेंडूत फक्त 25 धावा केल्या होत्या. डिव्हिलियर्सच्या सोबत त्याने भागिदारी करत त्याने संघाला पराभवापासून वाचवले होते. त्या ऐतिहासिक सामन्यात डीव्हिलियर्सने 297 चेंडूत 43 धावा केल्या होत्या.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.