Harmanpreet Kaur News: हरमनप्रीतच्या चिंतेत वाढ! ICC नंतर आता BCCI मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

Harmanpreet kaur Controversy: रॉजर बिन्नी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण तिची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
harmanpreet kaur
harmanpreet kaursaam tv
Published On

Team India: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आपल्या आक्रमक फलंदाजीमुळेओळखली जाते. नेहमी ती आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

चर्चेत येण्याचं कारण म्हणजे भारत -बांगलादेश सामन्यात तिने केलेले कृत्य. या सामन्यात तिने रागात स्टम्प उडवल्यानंतर ती अंपायरसोबत हुज्जत घातली होती. त्यामुळे आयसीसीने तिच्यावर २ सामन्यांची बंदी घातली आहे.

आता बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण तिची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

harmanpreet kaur
IND vs WI: कुलदीप-जड्डूची जोडी चमकली! पहिल्याच सामन्यात 'या' मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

माध्यमातील वृत्तानुसार रॉजर बिन्नी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे हरमनप्रीत कौरच्या कृत्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रॉजर बिन्नी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे दोघेही हरमनप्रीत कौरची भेट घेऊन तिला जाब विचारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच आयसीसीने लावलेल्या २ सामान्यांच्या बंदीवर देखील बीसीसीआयने कुठली प्रतिक्रिया दिली नाही. यावरून स्पष्ट आहे की, बीसीसीआय या कृतीवरून नाराज आहे.

काय आहे प्रकरण?

हरमनप्रीत कौरवर आयसीसीने २ सामन्यांची बंदी घातली. तसेच रॉजर बिन्नी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण जाब विचारण्यासाठी भेट घेणार. नेमकं असं काय घडलं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर झाले असे की, भारतीय महिला संघ आणि बांगलादेश महिला संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना सुरु होता.

या सामन्यात हरमनप्रीत कौरने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू तिच्या पॅडला जाऊन लागला. अम्पायरने तिला बाद घोषित केले. त्यावेळी रागात तिने थेट बॅट स्टम्पला मारली. शेवटी हा सामना बरोबरीत समाप्त झाला. ही मालिका १-१ ने बरोबरीत समाप्त झाली. (Latest sports updates)

harmanpreet kaur
IND vs WI: ..म्हणून रोहितने थेट बॅटिंग ऑर्डरच बदलली! सामन्यानंतर केला मोठा खुलासा

हे प्रकरण इथेच थांबलं नाही तर सामना झाल्यानंतर देखील तिने असं काही केलं ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. सामना झाल्यानंतर जेव्हा दोन्ही संघातील खेळाडू ट्रॉफी घेताना फोटो क्लिक करत होते त्यावेळी हरमनप्रीत कौरने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिने बांगलादेशच्या कर्णधाराला अंपायरला देखील बोलवा असं म्हटलं होतं. तिचं असं म्हणणं होतं की, बांगलादेशच्या विजयात अम्पायरने देखील मोलाची भूमिका बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com