Sachin Tendulkar Net Worth: निवृत्तीनंतर सचिन सध्या काय करतो? किती आहे एकूण संपत्ती?

Sachin Tendulkar Networth: 'गॉड ऑफ क्रिकेट' सचिन तेंडुलकर याचा आज ५१वा वाढदिवस आहे. सचिन त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक मोठे रेकॉर्ड बनवले आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सुद्धा तो दर महिन्याला करोडोंची कमाई करत आहे.
happy birthday sachin
happy birthday sachincanva

Sachin Tendulkar: जगभरात जेव्हा क्रिकेटची चर्चा केली जाते तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उल्लेख केला जातो. आज सचिन त्याचा ५१वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटमध्ये त्यानी मुख्य भूमिका बजावली आहे. १०० शतके आणि २०० कसोटी सामने खेळणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याला जगभरात 'गॉड ऑफ क्रिकेट' म्हणून ओळखले जाते. सचिनने त्याच्या कारकीर्दीत अनेक विक्रम केले आहेत. निवडत्तीनंतर त्याची एकुण संपत्ती किती? जाणून घ्या.

happy birthday sachin
Sachin Tendulkar Net Worth: निवृत्तीनंतर काय करत आहे मास्टर ब्लास्टर 'सचिन तेंडुलकर', किती आहे एकूण संपत्ती? जाणून घ्या

सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबईत झाला. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी सचिनने आंतराष्ट्रीय क्रिकेट कारकीृर्दीला सुरुवात करत एकापाठोपाठ एक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. आता त्याचे वय ५१ असून त्यानी २०१३मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादित सचिनच्या नावाचा समावेश आहे. माहितीनुसार, २०२३ पर्यंत सचिन तेंडुलकरची एकुण संपत्ती 175 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1436 कोटी रुपये होती. विषेश गोष्ट म्हणजे, त्यानी क्रिकेटमधून निवृती घेतली असली तरी त्याला दर महा अजूनही करोडो रुपये मिळतात.

सचिन तेंडुलकरची एकुण संपत्ती :

निवृत्ती नंतर सचिन अनेक जाहिराती करतो. त्यामुळे त्याला लाखो रुपये मिळतात. जाहिरातींमधून नाही तर अनखी इतर व्यवसायामधून तो लाखो रुपये कमवतो. सचिन मोठ्या ब्रँड्स सोबत कोलॅबरेट करून त्या कंपनींची जाहिरात करतो. बूस्ट, अनॅकॅडमी, कॅस्ट्रॉल इंडिया, बीएमडब्ल्यू, ल्युमिनस इंडिया या सारख्या मोठ्या कंपनींचा तो ब्रँड एँबॅसिटर आहे. या कंपनींचा ब्रँड एंडोर्समेंटमधून तो दरवर्षी २० ते २२ कोटी रुपये कमवतो. ब्रँड एंडोर्समेंटसोबतच सचिन तेंडुलकरचा कपड्यांचा व्यवसाय प्रसिद्ध आहे. माहितीनुसार, त्याचा ब्रँड टू ब्लू हा अरविंद फॅशन ब्रँड्स लिमिटेड यांच्यासोबत पार्टनशिपमध्ये केलेला व्यवसाय आहे. हा ब्रँड 2016 मध्ये लाँच करण्यात आले होते. त्यानंतर 2019 मध्ये, टू ब्लू अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लॉन्च करण्यात आला. याशिवाय सचिन तेंडुलकर त्याच्या रेस्टॉरंट व्यवसायातही सक्रिय दिसतो. मुंबई आणि बेंगळुरूमध्ये सचिन आणि तेंडुलकरच्या नावावर रेस्टॉरंट आहेत.

सचिन तेंडुलकरची आलिशान जीवनशैली:

सचिन तेंडुलकर त्याच्या आलिशान जीवनशैली आणि मुंबईतील पॉश वांद्रे भागात त्यांचा एक आलिशान बंगल्यामुळे चर्चेत असतो. माहितीनुसार, त्याच्या बंगल्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे. मात्र, त्यांनी हे घर 2007 मध्ये सुमारे 40 कोटी रुपयांना विकत घेतले होते. फक्त मुंबईतच नाही तर केरळमध्येही त्यांचा करोडोंचा बंगला आहे. त्याचा मुंबईतील वांद्रे येथील कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक आलिशान फ्लॅट देखील आहे. ब्रिटनमधील लंडनमध्येही त्याचे स्वतःचे घर असल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

happy birthday sachin
Ranji Cricketers Salary: रणजी क्रिकेटपटूंवर पडणार पैशांचा पाऊस! BCCI चा मास्टरप्लान तयार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com