Rohit Sharma: 'गल्ली क्रिकेट खेळतोय का..?.'लाईव्ह सामन्यात रोहित यशस्वी जयस्वालवर भडकला -VIDEO

Rohit Sharma Gets Angry On Yashasvi Jaiswal : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा यशस्वी जयस्वालवर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.
Rohit Sharma: 'गल्ली क्रिकेट खेळतोय का..?.'लाईव्ह सामन्यात रोहित यशस्वी जयस्वालवर भडकला - VIDEO
rohit sharmatwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. दरम्यान भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण सुरु असताना, कर्णधार रोहित शर्मा यशस्वी जयस्वालवर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Rohit Sharma: 'गल्ली क्रिकेट खेळतोय का..?.'लाईव्ह सामन्यात रोहित यशस्वी जयस्वालवर भडकला - VIDEO
IND vs AUS: लाईव्ह सामन्यात विराट- काँटास भिडले! नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

रोहित शर्मा भडकला

तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ ही जोडी मैदानावर होती. त्यावेळी रोहितने क्षेत्ररक्षणात बदल केला आणि यशस्वी जयस्वालला फलंदाजाच्या अगदी जवळ उभं केलं.

त्यावेळी क्षेत्ररक्षण करत असताना, चेंडू येण्याआधीच जयस्वाल उठून उभा राहत होता. हे पाहून कर्णधार रोहित शर्मा भडकला. त्यावेळी रोहित त्याला म्हणाला, ' गल्ली क्रिकेट खेळतोय काय...जोपर्यंत फलंदाज शॉट खेळणार नाही. तोपर्यंत उठायचं नाही...' रोहितचं हे बोलणं कॅमेऱ्यात कैद झालं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Rohit Sharma: 'गल्ली क्रिकेट खेळतोय का..?.'लाईव्ह सामन्यात रोहित यशस्वी जयस्वालवर भडकला - VIDEO
IND vs AUS: बॉक्सिंग डे टेस्टमधून शुभमन गिलला बाहेरचा रस्ता; नवख्या सॅम कॉन्स्टन्सने बुमराहच्याही आणले नाकीनऊ

ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात

बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी उस्मान ख्वाजा आणि सॅम काँटास ही जोडी मैदानावर आली.

दोघांनी ८९ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. सॅम काँटासने ६० धावांची खेळी केली. तर उस्मान ख्वाजाने ५७ धावा केल्या. मार्नस लाबुशेननेही शानदार खेळी करत ७२ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह चमकला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

या सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११ :

उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, अलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नेथन लायन, स्कॉट बोलंड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com