
Sakshi Murder Case: आयपीएल २०२३ स्पर्धा नुकताच संपन्न झाली. या स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या यश दयालने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही मिनिटातच त्याने स्टोरी डिलीट केली आहे.
मात्र आता या स्टोरीचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. चुकीची माहिती पसरवणारी माहितीचा स्क्रीन शॉट व्हायरल होताच आता यश दयालने माफी मागणारी पोस्ट शेअर केली आहे.
यश दयालने नुकताच शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, 'मित्रांनो मी ती स्टोरी शेअर केल्यामुळे तुमची माफी मागतो. ती पोस्ट चुकून शेअर केली गेली होती. द्वेष पसरवू नका. मी सर्व धर्मांचा आदर करतो.
गुजरात टायटन्स संघातील वेगवान गोलंदाज यश दयालने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
काही युझर्सने तर चक्क बीसीसीआय आणि गुजरात टायटन्स फ्रँचायझीकडे या खेळाडूवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Latest sports updates)
रिंकूने मारले होते ५ षटकार..
यश दयाल हा आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. या संघाचे प्रतिनिधित्व करताना तो कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाचं कारण ठरला होता.
कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवण्यासाठी अंतिम षटकात २८ धावांची गरज होती. अंतिम षटकात इतक्या धावा करणं म्हणजे फलंदाजांवर प्रेशर असतो.
मात्र फलंदाजी करत असलेल्या रिंकू सिंगने सलग ५ षटकार मारले आणि यश दयालला पूर्णपणे बॅकफूटवर आणलं. या षटकारांसह त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.