Drona Desai: 86 चौकार, 5 चौकार; 18 वर्षीय फलंदाजाने ठोकल्या 498 धावा

Who Is Drona Desai: गुजरातच्या १८ वर्षीय युवा फलंदाजाने मॅरेथॉन खेळी करत ४९८ धावा चोपल्या आहेत.
Drona Desai: 86 चौकार, 5 चौकार; 18 वर्षीय फलंदाजाने ठोकल्या 498 धावा
drona desai
Published On

अहमदाबादचा १८ वर्षीय द्रोण देसाई सध्या तुफान चर्चेत आहे. पठ्ठ्याने कारनामाच असा केलाय की, कुठलाही क्रिकेट फॅन त्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. द्रोणने अंडर-१९ शालेय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत सेंट जेवियर्स शाळेकडून खेळताना ४९८ धावांची मॅरेथॉन खेळी केली. या शानदार खेळीसह त्याने अनेक दिग्गज खेळाडूंचं लक्ष वेधून घेतलं आहे. या शानदार खेळीच्या बळावर त्याने आपल्या संघाला ७१२ धावांनी विजय मिळवून दिला.

Drona Desai: 86 चौकार, 5 चौकार; 18 वर्षीय फलंदाजाने ठोकल्या 498 धावा
IND vs BAN: कानपूर कसोटी सामना रद्द होणार? वाचा काय आहे कारण?

द्रोण देसाई हा अहमदाबादच्या सेंट जेवियर्स शाळेत शिकतो. या शाळेचं प्रतिनिधित्व करताना त्याने ही ऐतिहासिक खेळी केली आहे. आपल्या या खेळीदरम्यान त्याने ३२० चेंडूंचा सामना करत ४९८ धावांची खेळी केली. या धावा त्याने १५५.६२ च्या स्ट्राईक रेटने केल्या. यादरम्यान त्याने ९३ चेंडू बाऊंड्रीपार पाठवले.

ज्यात ८६ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. त्याला ५०० धावा करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र अवघ्या २ धावा दूर असताना त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे. ज्यावेळी तो बाद झाला, त्यावेळी संघाची धावसंख्या ७७५ इतकी होती. या संघाने आपला पहिला डाव ८४४ धावांवर घोषित केला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या जेएल इंग्लिश संघाला पहिल्या डावात ४० आणि दुसऱ्या डावात अवघ्या ९२ धावा करता आल्या.

Drona Desai: 86 चौकार, 5 चौकार; 18 वर्षीय फलंदाजाने ठोकल्या 498 धावा
IND vs BAN: कानपूर कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार! हा स्टार खेळाडू करु शकतो पदार्पण

असा रेकॉर्ड करणारा ठरला सहावा क्रिकेटपटू

ही मॅरेथॉन खेळी करताच द्रोण देसाईच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. द्रोण देसाई इतकी मोठी खेळी करणारा भारतातील सहावा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कल्याणच्या प्रणव धनवडेने सर्वाधिक १००९ धावांची खेळी केली होती. ही कुठल्याही भारतीय खेळाडूने आतापर्यंत केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

इतर कुठलाही भारतीय फलंदाज या रेकॉर्डच्या जवळपास पोहचू शकलेला नाही. तर दुसऱ्या स्थानी पृथ्वी शॉ आहे. त्याने ५४६ धावांची खेळी केली होती. तर डॉ. हवेवालाने ५१५, अरमान जाफरने ४९८ धावांची खेळी केली होती. आता या यादीत द्रोण देसाई या नावाचा देखील समावेश झाला आहे. असा रेकॉर्ड करणारा तो भारतातील सहावा फलंदाज ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com