गौतम गंभीरला हवी पूर्ण 'सत्ता'! रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या निवृत्तीमुळे झाला मार्ग मोकळा

Gautam Gambhir BCCI : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. याच दरम्यान मुख्य प्रशिक्षक गौतभ गंभीरला टीम इंडियावर एकहाती सत्ता हवी असल्याची चर्चा रंगली आहे.
Gautam Gambhir BCCI
Gautam Gambhir BCCIX
Published On

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीदरम्यान रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. खराब फॉर्ममुळे रोहित शर्माने प्लेईंग ११ मधून स्वत:ला वगळले. या मालिकेनंतर रोहितकडून नेतृत्वाची जबाबदारी घेतली जाणार हे स्पष्ट होते. तेव्हापासूनच रोहित शर्मा कसोटीमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला भारतीय संघावर एकहाती सत्ता हवी होती आणि यासाठीच तो त्याच्या मार्गातील अडथळे दूर करतोय अशी चर्चा रंगली आहे.

रोहित शर्माने ७ मे रोजी, तर विराट कोहलीने १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यामुळे गंभीरचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयच्या कामकाजात त्याला महत्त्वाचा हक्क हवा होता, तशी मागणी गंभीरने केली. रोहित व विराट यांनी निवृत्ती घेण्याच्या निर्णयामागे गौतम गंभीर असल्याची चर्चा आहे. आगरकर आणि गंभीर यांना मिळून बीसीसीआयची सूत्र हलवायची होती. रोहित-विराटच्या निवृत्तीवरुन तसे संकेत मिळत असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. शुबमन गिलकडे कसोटी संघाचे कर्णधारपद देण्याच्या चर्चांमागेही तेच आहेत असा अंदाज वर्तवला जात आहे.

Gautam Gambhir BCCI
लेक शाळेत पहिली आली, पण निकाल पाहायला तीच राहिली नाही; घरच्यांना अश्रू अनावर, कारण ठरले 'ते' गावगुंड, काय घडलं?

दैनिक भास्करने दिलेल्या माहितीनुसार, संघाची निवड, धोरणात्मक नियोजन आणि टीम इंडियाशी संबंधित निर्णयाच्या संबंधित प्रमुख निर्णय गौतम गंभीर घेणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं कुणीही उरलेलं नाही. भारताच्या कर्णधारापेक्षा मुख्य प्रशिक्षकाकडे जास्त अधिकार आहे अशी स्थिती पाहायला मिळत आहेत.

Gautam Gambhir BCCI
Pune News : आता थांबायच नाय...! घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने क्रॅक केली SSCची परीक्षा

भारतात येऊन न्यूझीलंडने व्हाइट वॉश करुन टीम इंडियावर मात केली होती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही भारताच्या पराभवाची पुनरावृत्ती झाली होती. कसोटी संघाची स्थिती सुधारण्यासाठी बोर्डाकडे गंभीरने पूर्ण स्वायत्ततेची मागणी केल्याचे अहवालात म्हटले आहे. शुबमन गिलकडे कर्णधारपद असावे असा गंभीर हट्ट आहे, असेही त्यात म्हटले आहे. रोहित-विराटच्या निवृत्तीमुळे त्याच्या या निर्णयाला आव्हान देणारं कोणी उरलं नाही त्यामुळे गंभीरकडे सत्ता गेल्याची चर्चा आहे.

Gautam Gambhir BCCI
जिद्दीला सलाम! रेल्वे स्थानकावर बेवारस सापडली, अनाथाश्रमात वाढली; दहावीत मिळवले ८९ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com