Wasim Akram Statement: 'विराटचं हे चुकलंच..' कोहली- गावस्कर वादात वसीम अक्रमची उडी!

Wasim Akram On Virat - Gavaskar Controversy: विराट कोहली आणि सुनील गावस्कर यांच्यात सुरु असलेल्या प्रकरणावर वसीम अक्रमने देखील भाष्य केलं आहे.
former pakistan cricketer wasim akram statement on virat kohli sunil gavaskar controversy amd2000
former pakistan cricketer wasim akram statement on virat kohli sunil gavaskar controversy amd2000google

सुनील गावस्कर आणि विराट कोहली हे दोघेही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहेत. मात्र दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकताच विराट कोहली आणि सुनील गावस्कर यांचं प्रकरण प्रचंड गाजतंय. विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवरुन भाष्य करणाऱ्या सुनील गावस्करांना विराट कोहलीने नाव न घेताल प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर सुनील गावस्करांनी देखील उत्तर दिलं. आता या प्रकरणात पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने उडी घेतली आहे. विराटने असं बोलायला नको होत, असा वसीम अक्रमने म्हटलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना वसीम अक्रम म्हणाला की, ' विराट आण गावस्कर हे दोघेही दिग्गज खेळाडू आहेत. मी सुनील गावस्करांना क्रिकेटच्या मैदानावर, एक माणूस म्हणून आणि मैदानाबाहेर चांगला ओळखतो. ते गेल्या कित्येक वर्षांपासून समालोचन करत आहेत. तर विराट कोहली देखील टॉपचा खेळाडू आहे. त्याने देखील धावांचा पाऊस पाडला आहे. मात्र त्याने असं बोलायला नको होतं.'

former pakistan cricketer wasim akram statement on virat kohli sunil gavaskar controversy amd2000
RCB Playoff Scenario: राजस्थानच्या पराभवाने RCB चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एकमेव पर्याय शिल्लक

गेल्या काही महिन्यांपासून विराटच्या टी-२० क्रिकेटमधील स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. सुनील गावस्करांनी देखील विराटच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर विराटने शानदार खेळी केली आणि सामन्यानंतर नाव न घेताच सुनील गावस्करांना जोरदार प्रत्तुत्तर दिलं होतं. विराटने केलेल्या वक्तव्यावर सुनील गावस्करांनी देखील पलटवार केल्याचे पाहायला मिळाले होते.

former pakistan cricketer wasim akram statement on virat kohli sunil gavaskar controversy amd2000
Sanju Samson Wicket: संजू सॅमसन आऊट की नॉट आऊट? अंपायरच्या निर्णयानंतर पेटला वाद - Video

विराटची आयपीएल २०२४ स्पर्धेतील कामगिरी...

विराट कोहलीने आयपीएलच्या या हंगामात शानदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये ५४२ धावा केल्या आहेत.या दरम्यान त्याने ६७.७५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने या हंगामात १५० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यापूर्वी २०१६ मध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या, त्यावेळी देखील त्याचा स्ट्राईक रेट १५० चा होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com