T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकप टीम इंडियाचाच..ऑस्ट्रेलियन दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

Micheal Clarke Prediction On T20 World Cup 2024: ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
T20 World Cup 2024:  टी-२० वर्ल्डकप टीम इंडियाचाच..ऑस्ट्रेलियन दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
indian cricket teamsaam tv

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ अमेरिकेत दाखल झाले आहेत. भारतीय संघ देखील अमेरिकेत दाखल झाला असून सराव करायला सुरुवात केली आहे. या स्पर्धेला २ जूनपासून प्रारंभ होणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर ९ जून रोजी भारत आणि पाकिस्ताना हे दोन्ही संघ भिडताना दिसून येणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल क्लार्कने मोठी भविष्यवाणी केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल क्लार्कच्या मते रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाला रोखणं हे इतर संघासमोर असलेलं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. भारतीय संघ ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघाकडे दमदार गोलंदाजी आणि मजबूत गोलंदाजी आहे. त्यामुळे भारतीय संघाला थांबवणं मुळीच सोपं नसेल असं मायकल क्लार्कचं म्हणणं आहे.

T20 World Cup 2024:  टी-२० वर्ल्डकप टीम इंडियाचाच..ऑस्ट्रेलियन दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 Final: सारखा स्कोर सारखं चेज! IPLच्या दोन फायनल स्क्रिप्टेड की योगायोग?

भारतीय संघ ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असला, तरीदेखील भारतीय संघाला २००७ नंतर एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पाकिस्तानला नमवत जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर १७ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र अजूनही भारतीय संघाला जेतेपदाचा मान मिळवता आलेला नाही.

भारतीय संघाने सेमीफायनल आणि फायनलमध्येही प्रवेश केला आहे. मात्र वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही. यंदाचा टी-२० वर्ल्डकप हा विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंसाठी शेवटचा टी-२० वर्ल्डकप असू शकतो. त्यामुळे सर्वच खेळाडू ही स्पर्धा जिंकण्यासाठी जोर लावताना दिसून येतील.

T20 World Cup 2024:  टी-२० वर्ल्डकप टीम इंडियाचाच..ऑस्ट्रेलियन दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
Team India Head Coach: T-20 WC आधी BCCI चा मोठा निर्णय! गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड जवळपास निश्चित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com