FIFA WC 2022: मेसी-रोनाल्डोचे संघ स्पर्धेतून बाहेर होणार? कोण कशी गाठणार दुसरी फेरी?

स्पर्धेत 32 संघ सहभागी आहेत, यामध्ये 16 संघांना पुढची फेरी गाठता येणार आहे.
FIFA
FIFASaam TV
Published On

FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक 2022 मध्ये सुरुवातीच्या टप्प्यात अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत. स्पर्धेत 32 संघ सहभागी आहेत, यामध्ये 16 संघांना पुढची फेरी गाठता येणार आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची बनली आहे. अनेक बलाढ्य संघांवर पुढील फेरी काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे पुढील समीकरण कसं असेल पाहा.

ग्रुप ए- ग्रुप एमध्ये नेदरलँड्सने कतारविरुद्ध विजय मिळवला किंवा ड्रॉ केला, तर तो अंतिम 16 मध्ये प्रवेश करेल. सेनेगलला हरवल्यास किंवा सामना अनिर्णित ठेवल्यास इक्वेडोरही पात्र ठरेल. सेनेगलला पुढील फेरी गाठण्यासाठी इक्वेडोरला हरवावे लागेल. पुढील सेनेगल-इक्वाडोर सामना अनिर्णित राहिला, तसेच कतारने नेदरलँड्सला पराभूत केले, तर सेनेगल देखील अंतिम-16 मध्ये पोहोचेल.  (Latest Marathi News)

FIFA
FIFA WC 2022: बेल्जियमच्या पराभवामुळे फॅन्सची सटकली; रस्त्यावर उतरुन राडा, अनेक ठिकाणी दंगलसदृश परिस्थिती

ग्रुप बी - ग्रुप बीमध्ये इंग्लंडने वेल्सविरुद्धच्या शेवटच्या गट सामन्यात किमान बरोबरी साधली तर ते पुढील फेरीत जातील. इंग्लंड जिंकल्यास गटात अव्वल स्थानी झेप घेईल. वेल्सविरुद्ध इंग्लंडचा पराभव झाला, तरीही ते पुढच्या फेरीत जाऊ शकतात. पण त्यानंतर त्यांना इतर सामन्यांवर अवलंबून राहावे लागेल. इराण आणि अमेरिका यांच्यातील सामना नॉकआउट असेल, ज्यामध्ये विजयी संघ पुढील फेरीत प्रवेश करेल.

वेल्स इंग्लंडला पराभूत करण्यात अपयशी ठरल्यास इराण बरोबरीत जाऊ शकतो. वेल्सने इंग्लंडला हरवले तरी बाद फेरीत जाण्याची खात्री देता येणार नाही. वेल्सला इंग्लिश संघाला किमान चार गोलांच्या फरकाने पराभूत करावे लागेल, तसेच इराण आणि अमेरिका यांच्यातील सामना अनिर्णित राहावा, अशी प्रार्थना करावी लागेल.

ग्रुप सी- अर्जेंटिनाचा संघ पोलंडविरुद्ध जिंकल्यास पुढील फेरीसाठी पात्र ठरेल. मात्र पोलंडने त्यांना हरवले तर अर्जेंटिनाचा संघ अडचणीत येईल. अशावेळी त्यांना सौदी अरेबिया आणि मेक्सिको यांच्यातील सामन्याचा निकालही पाहावा लागेल. पोलंडविरुद्ध बरोबरी साधून अर्जेंटिनाही पुढची फेरी गाठू शकतो.

ग्रुप डी - फ्रान्सने पहिले दोन सामने जिंकून पात्रता मिळवली आहे. ट्युनिशिया, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यापैकी कोणीही पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकतो. ऑस्ट्रेलियाचा सामना डेन्मार्कशी होईल, ज्याचा विजेता संघ पुढील फेरीत पोहोचेल. ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्कचा सामना अनिर्णित राहिला तर ट्युनिशियासाठी दरवाजे उघडतील. अशा स्थितीत ट्युनिशिया फ्रान्सला दोन किंवा अधिक गोलांनी पराभूत करून पुढील फेरी गाठू शकतो.

FIFA
Ruturaj Gaikwad: कस्सं कायssss ! एका षटकात ७ षटकार; मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची विस्फोटक खेळी, VIDEO पाहा

ग्रुप ई- गट ईचे समीकरण थोडेसे क्लिष्ट आहे. जर्मनीने कोस्टारिकाला कोणत्याही परिस्थितीत हरवले पाहिजे. जर जर्मन संघाने कोस्टा रिकाला हरवले तर जर्मनीचे चार गुण होतील. मात्र सोबतच जर्मनीला दुसऱ्या सामन्याचा निकालही पाहावा लागणार आहे. जपानविरुद्धचा सामना स्पेनने जिंकावा अशी जर्मन संघाची इच्छा असेल. या स्थितीत स्पेनचे सात आणि जर्मनीचे चार गुण होतील. अशा स्थितीत जपान आणि कोस्टा रिकाचे केवळ तीन गुण असतील. मात्र या दोनपैकी कोणताही सामना अनिर्णित राहिला तर जर्मनीच्या अडचणी वाढू शकतात.

ग्रुप एफ- ग्रुप एफ बद्दल बोलायचे झाले तर कॅनडा क्रोएशियाकडून पराभूत होऊन बाहेर पडला आहे. क्रोएशिया बेल्जियमविरुद्ध विजय/ड्रॉसह पात्र ठरेल. क्रोएशिया हरला तरी पात्र ठरेल जर बेल्जियमने मोरोक्कोला हरवले. कॅनडाविरुद्ध विजय/ड्रॉसह मोरोक्को पात्र ठरेल. क्रोएशियाने बेल्जियमचा पराभव केल्यास तेही पात्र ठरतील. त्याचबरोबर बेल्जियम क्रोएशियाविरुद्धच्या विजयासह पात्र ठरेल.

ग्रुप जी- ग्रुप जीमधील चारही संघांना पात्र ठरण्याची संधी आहे. हे समीकरण कॅमेरून आणि सर्बिया यांच्यातील सामन्यापूर्वीचे आहे. ब्राझील आणि घाना देखील ग्रुप-जीमध्ये आहेत.

ग्रुप एच- ग्रुप एचमधील चारही संघांना पात्र होण्याची संधी आहे. ही समीकरणे घाना आणि दक्षिण कोरिया आणि पोर्तुगाल आणि उरुग्वे यांच्यातील सामन्यापूर्वीची आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com