FIFA WC 2022: बेल्जियमच्या पराभवामुळे फॅन्सची सटकली; रस्त्यावर उतरुन राडा, अनेक ठिकाणी दंगलसदृश परिस्थिती

ब्रुसेल्समधील जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केला.
Belgium News
Belgium NewsSaam TV

FIFA World Cup 2022:  कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. रविवारी फिफा क्रमवारीत नंबर-2 असलेल्या बेल्जियमला ​​मोरोक्कोकडून 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर बेल्जियममध्ये फॅन्सचा राग अनावर झाला. यामुळे विविध शहरांमध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषक सामन्यातील पराभवानंतर हजारो चाहते बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये रस्त्यावर उतरले आणि संघाविरोधात घोषणाबाजी केली. याठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी वाहने व दुचाकींवर आपला राग काढला.   (Latest Marathi News)

Belgium News
Ruturaj Gaikwad: कस्सं कायssss ! एका षटकात ७ षटकार; मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची विस्फोटक खेळी, VIDEO पाहा

काही वेळातच या आंदोलनाचे हिंसाचारात रूपांतर झाले. येथे अनेक ठिकाणी मोरोक्को आणि बेल्जियमचे चाहते आमनेसामने आले आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. अनेक सार्वजनिक वाहनांची तोडफोड करण्यात आली. (Football)

ब्रुसेल्समधील जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केला. पोलिसांनी ब्रुसेल्समध्ये सुमारे डझनभर लोकांना ताब्यात घेतले आहे. तर आठ जणांना उत्तरेकडील अँटवर्प शहरातही ताब्यात घेण्यात आले.

Belgium News
FIFA WC 2022: सेनेगलचा दणका, कतारचं टेन्शन वाढलं; सलग दोन धक्के यजमान संघाला विश्वचषकातून बाहेर फेकणार?

ब्रुसेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दंगलखोर रस्त्यावर उतरले, त्यांनी कार, ई-स्कूटर पेटवून दिल्या आणि वाहनांवर दगडफेक केली. या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ब्रुसेल्सचे महापौर फिलिप क्लोस यांनी लोकांना शहराच्या मध्यभागी एकत्र न येण्याचे आवाहन केले आणि सांगितले की अधिकारी रस्त्यावर सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. पोलिसांच्या आदेशानंतर रेल्वे आणि ट्राम वाहतूक विस्कळीत झाली आहे.

नेदरलँडमध्येही दहशत

नेदरलँडमधील पोलिसांनी सांगितले की रॉटरडॅममध्ये हिंसाचार झाला आहे. फुटबॉल प्रेमींनी पोलिसांवरही दगडफेक करत जाळपोळ आणि तोडफोड केली. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी उशीरा अनेक शहरांमध्ये अशांतता पसरली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशाची राजधानी अॅमस्टरडॅम आणि हेगमध्ये तणावाचे वातावरण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com