VIDEO: वानखेडे खचाखच, चर्चगेट तुडुंब! धो धो पावसात क्रिकेटप्रेमींचा टीम इंडियाच्या स्वागताचा जल्लोष

Team India Victory T20 World Cup 2024: वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांची मोठी गर्दी दिसत आहे. लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मरीन ड्राईव्हवर गर्दी केली आहे.

वानखेडे स्टेडियम चाहत्यांच्या गर्दींने खचाखच भरलं आहे, थोड्याच वेळात येथे भारतीय संघ दाखल होणार होणार आहे. या ठिकाणी एक बस दिसत आहे. याच बसवर टीम इंडियाचे खेळाडू अन् ट्रॉफी असणार आहे. केवळ हाच क्षण बघण्यासाठी क्रिकेटप्रेमींची तुफान गर्दी झाली आहे. आपल्या लाडक्या, आपल्या आवडती क्रिकेट प्रेमींना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्रिकेटप्रेमी गर्दी करत आहेत. वानखेडे स्टेडियम हाऊसफुल झालं आहे. उत्सुकता केवळ भारतीय संघ या ठिकाणी येण्याची आहे. ढोल ताशांच्या गजरात क्रिकेटप्रेमी आनंद साजरा करत आहेत. मरीन ड्राईव्हवर पावसाला देखील सुरूवात झाली आहे. 'इंडिया, इंडिया'केवळ हाच आवाज परिसरात घुमत आहेत. डोक्यावर छत्री घेऊन हातात तिरंगा घेवून चाहते मोठा जल्लोष साजरा करत आहेत. दादर स्टेशनवर देखील मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com