आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला केवळ एका धावेने पराभवाचा सामना करावा लागला आहे. २२३ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २२१ धावांपर्यंत मजल मारता आली. हातातून निसटलेला सामना कर्ण शर्माने ३ षटकार खेचून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या दिशेने खेचून आणला. मात्र तो बाद झाल्यानंतर सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या दिशेने फिरला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा हा ८ पैकी सातवा पराभव आहे. या संघाला केवळ पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळवता आला आहे. या परभवासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर झाला आहे. दरम्यान सामन्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने या सामन्यातील टर्निंग पॉईंट सांगितला आहे.
सामना झाल्यानंतर फाफ डू प्लेसिस म्हणाला की, ' हा खूप रोमांचक असा सामना होता. माझ्यासाठी सुनील नरेनचं षटक टर्निंग पॉईंट होतं. हा खेळ पूर्णपणे बदलला आहे. त्यामुळे तुम्ही फलंदाजीला आल्यानंतर सेट होण्यासाठी ७-८ चेंडू घेऊ शकत नाही. तुम्हाला पावरप्लेचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल आणि विकेट्स गेल्या तरी खंबीर उभं राहावं लागेल. मला अभिमान वाटतोय, आम्ही कडवी झुंज दिली.'
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा पराभव..
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करतानात कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकअखेर २२२ धावा केल्या. या धावांचाा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला २२१ धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या षटकात कर्ण शर्माने तुफान फटकेबाजी करत स्टार्कच्या षटकात ३ षटकार खेचले. रॉयल चॅलेंजर्स बंघळुरु संघाला हा सामना जिंकण्याची संधी होती. मात्र शेवटच्या चेंडूवर हा सामना गमवावा लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.