Joe Root Wicket Video
Joe Root Wicket Videoinstagram

Viral Cricket Video: ग्लेन मॅक्सवेल स्टाईल फटका खेळण्याच्या नादात जो रुट क्लीन बोल्ड! पाहा Video

Joe Root Video: या सामन्यात जो रुट अवघ्या २८ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.
Published on

Joe Root Wicket Video:

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट हा फॅब ४ फलंदाजांपैकी एक आहे. मात्र वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत इंग्लंड संघासाठी त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये त्याने दमदार खेळ दाखवला. मात्र पुढील ६ सामन्यांमध्ये त्याला सुर गवसला नाही. इंग्लंडच्या चाहत्यांना असं वाटलं होतं की, नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात तो मोठी खेळी करेल. मात्र असं काहीच झालं नाही,तो अवघ्या २८ धावा करत माघारी परतला.

क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होणं ही सामान्य गोष्ट आहे. मात्र जो रुट ज्या पद्धतीने बाद झालाय ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. नेदरलँडविरुद्च्या सामन्यात तो अवघ्या २८ धावा करत तंबूत परतला.

कसा झाला बोल्ड?

या सामन्यात फलंदाजी करत असताना जो रुट सेट झाला होता. तो २८ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी त्याने जो रुट स्पेशल रिव्हर्स स्कुप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि याच प्रयत्नात त्याची दांडी गुल झाली. रुटने रिव्हर्स स्कुप करण्याचा प्रयत्न करताच चेंडू दोन्ही पायांच्या मधून गेला आणि तो क्लीन बोल्ड झाला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

इंग्लंडचा जोरदार विजय..

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून प्रथम फलंदाजी करताना बेन स्टोक्सने सर्वाधिक १०८ धावांची खेळी केली. तर डेव्हिड मलानने ८७ धावांची खेळी केली.

या खेळीच्या बळावर इंग्लंडने ५० षटक अखेर ३३९ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ अवघ्या १७९ धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात इंग्लंडने १६० धावांनी विजय मिळवला.

Joe Root Wicket Video
World Cup 2023: वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत बुमराहचीच हवा! या रेकॉर्डमध्ये सर्वच गोलंदाजांना सोडलंय मागे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com