ENG vs PAK T20 World Cup Final Live Updates: पाकिस्तानला पराभूत करत इंग्लंड बनला वर्ल्ड चॅम्पियन, विश्वचषकावर कोरलं नाव

T20 World Cup Final ENG vs PAK: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील टी-०२ विश्वचषकातील अंतिम सामन्याचा टॉस झाला असून हा टॉस इंग्लंडच्या संघाने जिंकला आहे. इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याची निर्णय घेतला आहे.
ENG vs PAK T20 World Cup Final Match
ENG vs PAK T20 World Cup Final MatchTwitter/@ICC

15 षटकानंतर इंग्लंडची धावसंख्या ९७/४

15 षटकानंतर इंग्लंडची धावसंख्या ९७/४, इंग्लंडला विजयासाठी ३० चेंडूत ४१ धावांची आवश्यकता

इंग्लंडला चौथा झटका

इंग्लंडला चौथा झटका, शादाब खानने हॅरी ब्रूकला बाद केले. त्याने 23 चेंडूत 20 धावांची खेळी खेळली. ब्रूकने स्टोक्ससोबत चौथ्या विकेटसाठी 42 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली. इंग्लंडची धावसंख्या ८७/४

डकवर्थ ल्युईस नियमानुसार इंग्लंड १३ धावांनी पुढे

इंग्लंडने १० षटकांनंतर ७७ धावा केल्या आहेत. डकवर्थ ल्युईस नियमानुसार इंग्लंड १३ धावांनी पुढे

इंग्लंडच्या पॉवरप्लेमध्ये ४९ धावा

इंग्लंडने पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स गमावत ४९ धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून हारिस रौफने दोन विकेट्स घेतल्यात.

इंग्लंडला तिसरा झटका, कर्णधार जॉस बटलर बाद

इंग्लंडला 45 धावांवर तिसरा धक्का बसला आहे. कर्णधार जोस बटलर 26 धावा करून बाद झाला. हारिस रौफने बटलरला बादे केलं.

इंग्लंडला दुसरा झटका, फिल सॉल्ट १० धावांवर बाद

इंग्लंडला 32 धावांवर दुसरा धक्का बसला. हारिस रौफने आपल्या पहिल्याच षटकात फिलिप सॉल्टला इफ्तिखार अहमदकडे झेलबाद केले. सॉल्टला नऊ चेंडूत 10 धावा करता आल्या. सध्या जोस बटलर 10 चेंडूत 20 धावांवर असून बेन स्टोक्स क्रीजवर आहे.

पाकिस्तानची दमदार सुरुवात, इंग्लंडला पहिला झटका

पहिल्याच षटकात इंग्लंडला मोठा धक्का बसला. भारताविरुद्धच्या गेल्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या अॅलेक्स हेल्सला शाहीन शाह आफ्रिदीने क्लीन बोल्ड केले. त्याला दोन चेंडूत एक धाव करता आली.

पाकिस्तानचं इंग्लंडसमोर १३८ धावांचं आव्हान, सॅम करनच्या ३ विकेट

पाकिस्तानचं इंग्लंडसमोर १३८ धावांचं आव्हान, सॅम करनच्या ३ विकेट

पाकिस्तानला आठवा धक्का, पाकिस्तानची धावसंख्या १३१ वर ८ बाद

पाकिस्तानला आठवा धक्का, पाकिस्तानची धावसंख्या १३१ वर ८ बाद

पाकिस्तानला सहावा धक्का

पाकिस्तानला 18व्या षटकात सहावा धक्का बसला. ख्रिस जॉर्डनने शादाब खानला बाद केले. शादाबने 14 चेंडूत 20 धावा करता आल्या. पाकिस्तानची धावसंख्या 18 षटकांत 6 बाद 127 अशी आहे.

पाकिस्तानला पाचवा धक्का

17 व्या षटकात 121 धावांवर पाकिस्तानला पाचवा धक्का बसला. सॅम करनने शान मसूदला लियाम लिव्हिंगस्टोनकरवी झेलबाद केले. मसूदने 28 चेंडूत 38 धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीत त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. मसूद आणि शादाब खान यांनी पाचव्या विकेटसाठी 25 चेंडूत 36 धावांची भागीदारी केली.

पाकिस्तानला चौथा धक्का, इफ्तिखार बाद, धावसंख्या ८५वर ४ बाद

पाकिस्तानला १३व्या षटकात ८५ धावांवर चौथा धक्का बसला. इफ्तिखार अहमद खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला बेन स्टोक्सने यष्टिरक्षक जोस बटलरच्या हाती झेलबाद केले. शान मसूद आणि शादाब खान सध्या फलंदाजी करत आहेत. पाकिस्तानची धावसंख्या १३ षटकांनंतर ४ बाद ९० अशी आहे.

पाकिस्तानला तिसरा झटका, बाबर आझम आऊट

पाकिस्तानला तिसरा झटका, बाबर आझम ३२ धावांवर आऊट, रशीदेन घेतली विकेट, पाकिस्तानची धावसंख्या ८४ वर तीन बाद

पाकिस्तान 10 षटकांनंतर 68/2

पाकिस्तान 10 षटकांनंतर 68/2, बाबर-मसूद क्रीजवर, हरिस-रिझवान बाद

पाकिस्तानला दुसरा झटका, मोहम्मद हारिस बाद

पाकिस्तानला दुसरा झटका, मोहम्मद हारिस ८ धावांवर बाद, आदिल रशीदने केलं बाद

पॉवर प्लेनंतर पाकिस्तानची धावसंख्या एक बाद ३९ वर 

पॉवर प्लेनंतर पाकिस्तानची धावसंख्या एक बाद ३९ वर 

पाकिस्तानचा पहिला विकेट

मोहम्मद रिजवान क्लिन बोल्ड! सॅम करनच्या चेंडूवर रिझवान क्लीन बोल्ड झाला आहे. १४ बॉल्समध्ये १५ रन कमावून तो पव्हेलियनमध्ये परतला.

पाकिस्तानचा स्कोर

२९ रन, शून्य बाद, ४ ओव्हर पूर्ण

रिझवान स्ट्राईकवर

०.१ पहिल्या षटकाचा, पहिला चेंडू, रिझवान स्ट्राईकवर, स्टोक्सची गोलंदाजी, नो बॉल

पाकिस्तानचा संघ

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी

इंग्लंडचा संघ

जॉस बटलर (कर्णधार, यष्टिरक्षक), अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद

इंग्लंडने टॉस जिंकला! पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील टी-०२ विश्वचषकातील अंतिम सामन्याचा टॉस झाला असून हा टॉस इंग्लंडच्या संघाने जिंकला आहे. इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याची निर्णय घेतला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.